चोरट्यांचा गुरांवर डोळा, बैलजोडीसह दोन गुरे लंपास; शेतकऱ्याला न्याय मिळणार?
By ब्रह्मानंद जाधव | Published: April 2, 2023 05:13 PM2023-04-02T17:13:44+5:302023-04-02T17:13:54+5:30
गुरांच्या बाजारात जाऊन बघितले, मात्र बैलजोडी व गुरे मिळून आली नाही.
सिंदखेड राजा : किनगाव राजा परिसरात चोरट्यांचा आता गुरांवर डोळा दिसून येत आहे. किनगाव राजा येथील शेतातील एक बैलजोडी आणि दोन लहान गुरे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २ एप्रिल रोजी उघडकीस आली.
किनगाव राजा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुरे चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहे. दरम्यान, किनगाव राजा येथील शेतकरी अशोक मारोती काकड हे दररोज शेतात जागलीवर जात होते. मात्र १ एप्रिलच्या रात्री त्यांच्या घरचे कुणीही शेतात गेले नाही. दरम्यान, हीच संधी चोरट्यांनी साधून दोन बैल (अंदाजे किंमत १ लाख) आणि दोन लहान गुरे (अंदाजे किंमत ३० हजार रुपये) चोरट्यांनी चोरून नेली. २ एप्रिल रोजी शेतात जनावरे न दिसल्याने त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. गुरांच्या बाजारात जाऊन बघितले, मात्र बैलजोडी व गुरे मिळून आली नाही.