काकस यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By admin | Published: October 24, 2016 02:39 AM2016-10-24T02:39:11+5:302016-10-24T02:39:11+5:30
कॉग्रेस प्रवेशाराष्ट्रवादीला धक्का; राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण.
बुलडाणा, दि. २३- नगरसेवक दत्ता काकस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत २३ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचा हात धरला असून २३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात दिग्गजांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.
गेल्या आठवडाभरापासून काकस आणि काँग्रेस यांच्यातील सलगीच्या चर्चा या प्रवेशामुळे खर्या ठरल्या आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी सुटलेल्या बुलडाणा नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून दत्ता काकस यांच्या पत्नीच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता या प्रवेशानंतर बळावली असून याच ह्यकमिटमेंटह्णनंतर काकस यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला असल्याचे सूत्रांकडून कळते.
सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाचा रुमाल देऊन दत्ता काकस यांचा प्रवेश करण्यात आला. बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक यांच्या अनुमतीनंतर आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या सहमतीनंतर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच प्रदेश सरचिटणीस अँड. गणेशराव पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, बुलडाणा विधानसभेचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस श्यामबाबू उमाळकर, प्रदेश सरचिटणीस संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. त्यामुळे काकस यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार की केवळ काही तिकिटांवर त्यांना समाधान मानावे लागेल, हे काही दिवसात कळणार आहे.