काळ्याबाजारात जाणारा रेशनचा २५ क्विंटल तांदूळ पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:04 PM2020-07-04T17:04:14+5:302020-07-04T17:04:26+5:30
सुटाळा बु. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आला. दरम्यान, याप्रकारामुळे रेशन माफियांचे धाबे दणाणले आहे.
खामगाव : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत तसेच रेशनकार्ड धारकांना वितरीत करण्यात आलेला ५२ कट्टे तांदूळ काळ्या बाजारात जाण्यापूर्वी शनिवारी सकाळी पकडण्यात आला. सुटाळा बु. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आला. दरम्यान, याप्रकारामुळे रेशन माफियांचे धाबे दणाणले आहे.
खामगाव तालुक्यातील सुटाळा येथे तांदूळ खरेदी केल्या जात असल्याची माहिती सरपंचासह काही नागरिकांना मिळाली. या माहितीच्या आधारे गावात आलेल्या फेरीवाल्याचा शोध घेत, त्यांच्या त्याब्यातील ५२ कट्टे तांदूळ ताब्यात घेतला. पोलिस आणि पुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ पाचारण केले.
यावेळी पोलिस आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांदूळाचा पंचनामा केला. यावेळी पुरवठा निरिक्षक व्ही.एम.भगत, शिवाजी नगरचे पोलिस अधिकारी बरींगे, स्वस्त धान्य दुकानदार घोगले यांची उपस्थिती होती.
गावकºयांनी तांदूळ पकडून दिल्यामुळे भंगार आणि फेरीच्या माध्यमातून तांदूळ गोळा करणाºया रेशन माफियांचे धाबे दणाणले आहे.