हिवरा आश्रम येथे काेविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:22+5:302021-05-24T04:33:22+5:30
हिवरा आश्रम: ग्रामीण भागात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत आहे.येथील रुग्णालयातील कोविड केयर सेंटर सुरू झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना ...
हिवरा आश्रम: ग्रामीण भागात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत आहे.येथील रुग्णालयातील कोविड केयर सेंटर सुरू झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना याचा लाभ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केयर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते रविवारी बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव जाधव, प्रमुख पाहूणे म्हणून आ. डाॅ. संजय रायमूलकर,जि.प. सदस्य संजय वडतकर,शिवप्रसाद मगर, सरपंच प्राजक्ता नितीन इंगळे, गोकटे,जिल्हा शल्यचिकित्सक प्रशांत पाटील, डाॅ.सांगळे,डाॅ.वासेकर, तहसिलदार डाॅ. संजय गरकल, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,माजी सहाय्यक आयुक्त भुंजग धांडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ .ठोंमरे,डाॅ. अमित धांडे, डाँ.भुषण पागोरे,डाॅ.अझहर शेख,डाॅ.बसवेश्वर धाडकर,डाॅ.स्वप्निल सुसर,डाॅ.पुजा नागरीक, डाॅ.मयुर निकस,डाॅ.नीलेश निकस, डाॅ.शिवानी मिटकरी ,डाॅ.पल्लवी कुऱ्हाळे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या सेवेचा लाभ व्हावा याकरीता हिवरा आश्रम येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले.रविवारी या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस या रुग्णालयसाठी कोणतीही बाब कमी पडू देणार नाही.तसेच काही कमी असल्यास मागणी करा ती तत्काळ पूर्ण करून देतो, असेही डाँ.शिंगणे म्हणाले.
काेविड सेंटरमध्ये १०० बेडची सुविधा
या ग्रामीण रुग्णालयातील केअर सेंटर मध्ये ५० ऑक्सिजन बेड, ५० साध्या बेडची सुविधेसह राहणार आहे़ या कोविड केअर सेंटरचा जवळपासच्या ३० ते ४० खेड्यांतील कोविड रुग्णांना लाभ होणार आहे. रुग्णालयासाठी लागणाऱ्या जनरेटर व इतर आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी खा.जाधव यांनी संबंधितांना सूचना केल्या.
लहान मुलांसाठी विशेष कक्ष
तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता या रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष व सर्व सुविधायुक्त असे बालविभागाचे कोविड केयर सेंटर सुरू होणार आहे. याकरीता नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अमित धांडे हे काम पाहणार आहेत.