सैलानी दर्गा परिसरातील सीसी फुटेज पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:36+5:302021-04-05T04:30:36+5:30

संदलसाठी आम्ही कोणाला निमंत्रण दिले नाही: चांद मुजावर हाजी हजरत अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबा यांचा संदल काढणे ही ...

CC footage of Sailani Dargah area in police custody | सैलानी दर्गा परिसरातील सीसी फुटेज पोलिसांच्या ताब्यात

सैलानी दर्गा परिसरातील सीसी फुटेज पोलिसांच्या ताब्यात

Next

संदलसाठी आम्ही कोणाला निमंत्रण दिले नाही: चांद मुजावर

हाजी हजरत अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबा यांचा संदल काढणे ही परंपरा आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने यात्रा उत्सवावर स्थगिती आणली. आम्ही प्रशासनाला नेहमी सहकार्य करत आलो. मर्यादित लोकात धार्मिक विधीला बंदी नाही, त्यानुसार मोजक्या मुजावर परिवारातील सदस्यांनी पिंपळगाव सराई येथील संदल घरातून परंपरेनुसार जुन्या संदल मार्गाने न जाता प्रशासनाला सहकार्याची भावना मनात ठेवून जीपमध्ये बसून मुख्य मार्गाने संदल घेऊन मजार-ए-शरीफवर चढवला. संदलमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही कोणालाही निमंत्रण दिले नाही व कोणालाही बोलवले नाही, त्यामुळे झालेली ही कारवाई चुकीची आहे, असे मत बुलडाणा पंचायत समितीचे सदस्य शेख चांद मुजावर यांनी दिली आहे.

Web Title: CC footage of Sailani Dargah area in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.