बाळाला टाकून जाणाऱ्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज 9 महिन्यानंतर केले सार्वजनिक

By भगवान वानखेडे | Published: September 1, 2022 06:45 PM2022-09-01T18:45:16+5:302022-09-01T18:45:36+5:30

नऊ महिन्यानंतरही त्या निर्दयी मातेचा शोध लागेना : माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

CCTV footage of woman abandoning baby released after 9 months in buldhana | बाळाला टाकून जाणाऱ्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज 9 महिन्यानंतर केले सार्वजनिक

बाळाला टाकून जाणाऱ्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज 9 महिन्यानंतर केले सार्वजनिक

googlenewsNext

बुलढाणा : अगदी एका महिन्याचे बाळ बेवारस सोडून देऊन माता पसार झाली होती. ही घटना २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.५० वाजता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली होती. त्या निर्दयी मातेचा नऊ महिन्यानंतरही शोध लागत नसल्याने शहर पोलिसांनी बाळासह महिलेचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करुन अशी महिला दिसल्यास कळविण्याचे आवाहन केले आहे.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २५ नोव्हेंबर २०२१ रोजी परिचारिकांचा राऊंड सुरु असताना परिचारिका सुनिता काळवाघे यांना शासकीय रक्तपेढीजवळ एक बेवारस बाळ कपड्यात गुंडाळले दिसून आले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती देऊन कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन शहर पोलिसांत अज्ञात मातेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्या निर्दयी मातेचा शोध लागत नसल्याने शहर पोलिसांनी बाळासह त्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करुन अशा आशयाची महिला दिसल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवहन केले आहे.

मातेविनाच ते बाळ झाले १० महिन्याचे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी २५ नोव्हेंबर रोजी एका महिन्यांचे बाळ टाकून पसार झालेली महिलेचा शोध लागत नसताना ते बाळ आधी जिल्हा सामन्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आणि आता येथील लव्ह ट्रस्टमध्ये मातेविनाच १० महिन्यांचे झाले आहे.

नकोशी म्हणुन तर टाकली नसावी?
जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस टाकून दिलेले बाळ हे स्त्री जातीचे असून, नकोशी म्हणुन तर टाकून दिलेली नसावी ना असाही संशय निमित्ताने पोलीस व्यक्त करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या महिला दिसल्यास येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, माहिती देणाऱ्यांचे नांव गुप्त ठेवले जाणार आहे.
-सम्राट ब्राम्हणे, पोलीस उपनिरीक्षक,बुलढाणा.

Web Title: CCTV footage of woman abandoning baby released after 9 months in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.