‘राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला साजरा करा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:05 AM2018-01-02T00:05:23+5:302018-01-02T00:07:12+5:30
किनगावराजा : येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लखोजीराव जाधव यांचे किनगावराजा, आडगावराजा, उमरद, मेहुणाराज, देऊळगावराजा व जवळखेड येथील वंशज शाखेच्यावतीने शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला साजरा व्हावा, अशी मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
किनगावराजा : येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लखोजीराव जाधव यांचे किनगावराजा, आडगावराजा, उमरद, मेहुणाराज, देऊळगावराजा व जवळखेड येथील वंशज शाखेच्यावतीने शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला साजरा व्हावा, अशी मागणी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी काशिनाथ मेहेत्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद ठाकरे, प्रा.नायकवाड, रामदास कहाळे, भगवानराव नागरे यांची उपस्थिती होती. यावेळी २ जानेवारी पौष पौर्णिमेला जिजाऊ जन्मोत्सव तिथीनुसार साजरा होण्याकरिता राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज असलेल्या सहा गावच्या शाखेतील राजे जाधव परिवाराने करण्याचे ठरविले असून, या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी विनोद ठाकरे यांनी राजे लखुजीराव जाधव यांचे सर्व राजे जाधव वंशज शाखेवर प्रकाश टाकला.
यावेळी राजे गणेशराव जाधव यांनी लखोजीराव जाधव यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. तसेच सर्व धर्म समावेशक हा सोहळा साजरा व्हावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन राजे यांनी केले. तर सूत्रसंचालन ज्ञानेश राजे यांनी केले. आभार प्रतापराव राजे आडगाव राजा यांनी मानले. यावेळी सुभाष राजे, भागत राजे, संजय राजे, बाळासाहेब राजे, सुभाष राजे आडगाव राजा, विठ्ठल राजे, दत्ताराजे, गोपाल राजे, मालोजी राजे हे उपस्थित होते.
देऊळगावराजा : पौष पौर्णिमेनिमित्त जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन
स्वराज्यप्रेरक राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांच्यावतीने पौष पौर्णिमा २ जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळावर होणार असून, राजे लखुजीरावांचे वंशज असणार्या आडगाव राजा, किनगाव राजा, देऊळगाव राजा, उमरद, मेहुणा राजा व जवळखेड येथे राहणार्या वंशजांच्यावतीने ही जयंती साजरी होणार आहे. जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २ जानेवारीला सकाळी ५.४५ मी. पासून जिजाऊ मासाहेबांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक, विधिवत पातळ चढविणे, फटाक्यांची आतषबाजी त्यानंतर ७.३0 वाजता ढोलताशांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणा, ९ वाजता इतिहासकार प्रा.डॉ.घुगे यांचे जिजाऊंच्या चरित्रावर व्याख्यान होणार आहे. तसेच १२ जानेवारी रोजीसुद्धा सकाळी वंशजांच्या हस्ते सूर्योदयाच्या वेळी विधिवत पूजन होईल, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक, आडगाव राजा, किनगाव राजा, देऊळगाव राजा, उमरद, मेहुणा राजा व जवळखेड येथील वंशजांनी दिली.