पर्यावरणपूरक होळी साजरी करा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:32 AM2021-03-28T04:32:49+5:302021-03-28T04:32:49+5:30
होळी व रंगपंचमी हे सण जवळ आले असून ते साजरे करताना पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे ...
होळी व रंगपंचमी हे सण जवळ आले असून ते साजरे करताना पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. होळी या सणामध्ये अनेक नागरिक गावामध्ये मोठमोठे लाकडे, शेणाच्या गोवऱ्या, पुरणपोळीचा नैवद्य जाळून होळी साजरी करतात. परंतु, यामुळे निसर्गाचे एकप्रकारे नुकसान होत असून दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. यामध्ये वृक्षतोडही होते. त्याचप्रमाणे वायू प्रदूषण निर्माण होत आहे. प्रत्येकाने झाडाची पूजा करून होळी साजरी करावी. रंगपंचमी सण साजरा करताना रासायनिक रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करून पाण्याचा अपयव टाळावा, रासायनिक रंगामुळे डोळ्यांना व त्वचेला इजा होऊ शकते, अशा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व पाण्याचा दुरुपयोग होणार नाही, म्हणून पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी दोन्ही सण साजरे करावे, असे आवाहन विनोद सातपुते यांनी केले.