आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:45+5:302021-06-22T04:23:45+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हिंग, योग विद्याधाम नाशिक, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्वप्रथम आ. संजय गायकवाड यांनी महान धावपटू स्व. मिल्खा सिंग यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन उपस्थित सर्वांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी जैन, नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक सुभाष आठवले, डॉ. राजेश्वर उबरहंडे आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन कार्यक्रमासाठी प्रात्यक्षिक अंजली परांजपे, प्रशांत लहासे व सचिन खाकरे यांनी सादर केले. या कार्यक्रमात उपस्थितांना योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकांसह तसेच प्राणायम, कपालभाती, अनुलोम -विलोम, हे प्रकार करुन घेतले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. ऑनलाईन कार्यक्रमात बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, क्रीडा शिक्षक, खेळाडू, पालक, योग प्रेमी नागरिक ऑनलाईन सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचलन रवींद्र धारपवार यांनी केले. तर आभार अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी मानले. याप्रसंगी नेहरु युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, ए.एस.पी.एम.महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद ढवळे, प्रा. कैलास पवार, अन्न व औषध विभागाचे घिरके, गोविंदा खुमकर, विजय वानखेडे व योग प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास डुडवा, विनोद गायकवाड, किरण लहाने, अक्षय कराड, नवनाथ कारके, जिल्हा संघटक गाईड मनिषा ढोके, विजय बोदडे, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी परिश्रम घेतले.