कोरोना नियमांचे पालन करून घरीच रमजान ईद साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:38+5:302021-05-14T04:34:38+5:30
मुस्लिम धर्मीयांचे रमजान महिन्याचे ३० रोजे १३ मे रोजी संपले. सोबतच सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने १४ मे रोजी ईद-उल-फित्र साजरी ...
मुस्लिम धर्मीयांचे रमजान महिन्याचे ३० रोजे १३ मे रोजी संपले. सोबतच सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने १४ मे रोजी ईद-उल-फित्र साजरी करण्यात येणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचे संकट असल्याने शासनाने सर्वधर्मीय सण-उत्सव, धार्मिक, राजकीय कार्यक्रमावर बंदी घातलेली आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच सध्या कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही नियम लागू केलेले आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, आदींचा समावेश आहे. प्रत्येकांनी नियमांचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच रमजान ईद घरीच साध्या पद्धतीने साजरी करून घरीच ईदची नमाज अदा करावी, ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी हस्तांदोलन व गळाभेट करू नये, असे आवाहन जमिअत उलमा-ए-हिंदचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष हाफिज शेख खलीलउल्लाह यांनी केले आहे.
- शासकीय आदेशाचे पालन करावे -
कोरोनाचा संसर्ग थांबावा म्हणून शासन प्रयत्न करीत असून, अनेक
निर्बंध घातलेले आहे. शुक्रवारी रमजान ईद साजरी होणार. यादरम्यान
मुस्लिम बांधवांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्या
घरीच ईदची नमाज पठण करावी. तसेच ईदनंतर गळाभेट व हस्तांअदोलन करू नये,
असे आवाहन बुलडाणा येथील मोती मशिदीचे इमाम हाफिज मुजाहिद कुरेशी यांनी
केले आहे.
- घरीच ईदची नमाज अदा करा -
सध्याच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या शासनाने कडक निर्बंध लावलेले आहे. या निर्बंधाचे आपण सर्वांनी पालन करावे, तसेच रमजान ईदची नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी घरीच अदा करावी, असे आवाहन बुलडाणा येथील जामा मशिदीचे इमाम हाफिज रहमत यांनी केले आहे.