चिखलीत समाजाभिमूख कार्यक्रमाने भगवा सप्ताह साजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:48+5:302020-12-31T04:32:48+5:30

चिखली : चिखली शिवसेना व युवा सेनेच्यावतीने विविध समाजाभिमूख उपक्रम राबवून भगवा सप्ताह साजरा करण्यात आला. यानुषंगाने आयोजित रक्तदान ...

Celebrate Saffron Week with Chikhali community oriented program! | चिखलीत समाजाभिमूख कार्यक्रमाने भगवा सप्ताह साजरा!

चिखलीत समाजाभिमूख कार्यक्रमाने भगवा सप्ताह साजरा!

Next

चिखली : चिखली शिवसेना व युवा सेनेच्यावतीने विविध समाजाभिमूख उपक्रम राबवून भगवा सप्ताह साजरा करण्यात आला. यानुषंगाने आयोजित रक्तदान शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले.

भगवा सप्ताह व शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली शहरात शिवसेनेचे १० तर युवा सेनेच्या १० असे एकूण २० शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यानुषंगाने सर्व शहरातून रॅली काढून वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, चिखलीचे आराध्य दैवत रेणुकामातेला शहर शिवसेनेच्यावतीने पातळ अर्पण करण्यात आले, तसेच शिवसेना जनसंपर्क कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन केंद्रीय ग्रामीण विकास समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, जिल्हा प्रमुख जालींदर बुधवत, युवासेना जिल्हाप्रमुख हृषी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, गोरगरीब व गरजूंना खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुका प्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे, प्रीतम गैची, श्याम शिंगणे, नगरसेवक दत्ता सुसर, युवासेना श.प्र.विलास घोलप, रवी पेटकर, आनंद गैची, शिवसेना उपतालुका प्रमुख किसनराव धोंडगे, विलास सुरडकर, शिवाजीराव पवार, सखाराम भुतेकर, प्रदीप वाघ, रवी भगत, रामकृष्ण अंभोरे, किसना जाधव, शहरातील व तालुक्यातील नवनियुक्त शाखेचे शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसेना युवासेना आजी, माजी पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Celebrate Saffron Week with Chikhali community oriented program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.