हेल्मेट वाटप करून शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:22 AM2021-02-22T04:22:54+5:302021-02-22T04:22:54+5:30
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. वेगवेगळ्या गावखेड्यांतील गोरगरीब १९ कामगार तरुणांना समाजक्रांती परिवाराच्या वतीने हेल्मेटचे मोफत ...
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. वेगवेगळ्या गावखेड्यांतील गोरगरीब १९ कामगार तरुणांना समाजक्रांती परिवाराच्या वतीने हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले. मागील वर्षामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीतसुद्धा सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न परिवाराने केलेला आहे. हेल्मेट वाटप करून रस्ता सुरक्षेविषयी संदेश देण्यात आला. मेहकरमध्ये वेगवेगळ्या गावांतून बरेच बेरोजगार तरुण कामगार मुले रोजंदारीने कामासाठी येत असतात. वेगवेगळ्या हाॅटेल्स, हॉस्पिटल्स, दुकानं, गॅरेज वा बँकांमध्ये अगदी दीडशे ते २०० रुपये रोजंदारीने ते काम करीत असतात. मात्र दररोज घरून ये-जा करताना हेल्मेटचा वापर मात्र जास्त प्रमाणात दिसून येत नाही. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता रस्ता सुरक्षा हा खूप मोठा प्रश्न आहे. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी वा वेगवेगळे महत्त्वाचे दिवस संकल्पपूर्वक व समाजहित जोपासत साजरे करणे काळाची गरज झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर हेल्मेट वाटपचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांची उपस्थिती होती. यावेळी समाजक्रांती परिवाराचे गजानन पाटोळे, ज्येष्ठ मार्गदर्शक मंगल शेठ, जैन कोठारी, रवींद्र बोरे, अरुण दळवी, रमेश ठाकरे, राजेश बोरे, गजानन पातळे, अनिल तुरूकमाणे यांसह कामगार मुले उपस्थित होते. (फोटो )