क्रीडा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:40 AM2021-09-04T04:40:54+5:302021-09-04T04:40:54+5:30
प्रधानमंत्री मातृत्व वंदन सप्ताहाला सुरूवात बुलडाणा : प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर अंतर्गत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत ‘मातृत्व वंदना सप्ताहाचे ...
प्रधानमंत्री मातृत्व वंदन सप्ताहाला सुरूवात
बुलडाणा : प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर अंतर्गत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत ‘मातृत्व वंदना सप्ताहाचे उद्घाटन सरपंच सुनील देशमाने यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. तायडे यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निलेश राजपूत व वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी या योजनेबाबत माहिती देऊन गरोदर मातांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र, रायपूर येथे गरोदर मातांना बोलावून त्यांची पीएमव्हीवायचे फॉर्म भरून घेण्यात आले.
गुटखा बंदीच्या अंमलबजावणीसाठी उपोषण
बुलडाणा : राज्यात गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी खामगाव तालुक्यातील सुटाळा येथील दिलीप देविदास काळे यांनी ३१ ऑगस्टपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे. शासनाने राज्यात अगोदर २०१३ पासून सुगंधित तंबाखू, पान मसाला या वस्तूवर जनतेच्या आरोग्यास घातक असल्याच्या कारणामुळे बंदी घातली आहे. त्यानंतर मात्र ही अंमलबजावणी फक्त कागदावरच दिसत आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात गुटखा बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी दिलीप काळे यांनी मंगळवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.
प्रबोधनच्या प्राचार्य पदी प्रवीण महाजन यांची निवड
बुलडाणा : येथील प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रवीण महाजन यांची नियुक्ती झाली आहे. यावेळी उपमुख्याध्यापक ओमप्रकाश नव्हाल, अरविंद सैतवाल, चंद्रकांत जोशी यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
मुगावर भारुका किडीचा प्रादुर्भाव ; शेतकऱ्यांचे नुकसान
मेहकर : तालुक्यातील अनेक भागातील मूग पिकावर भारुका किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मूग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पिकाचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांनी उडीद, मूग पिकाची पेरणी केली. परंतु पीक येण्याचा कालावधी उलटला तरी शेतकऱ्यांच्या उडीद, मुगाला भारुका किडीमुळे शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
--
पोळा सणाच्या तयारीसाठी सजला बाजार
बुलडाणा : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सण बैल पोळा हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शहरातील आठवडे बाजारात बैल पोळ्यासाठी असलेल्या साजाची मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. कोरोनाचे पुन्हा सावट येते की काय या भीतीपोटी अनेकांमध्ये निरुत्साह पहायला मिळत आहे. शहरातील आठवडे बाजारात बैल पोळ्यासाठी बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य झुला, गोंडे, कासरा, वेसन, घुंगरू, घांगरमाळ आदी साहित्याची दुकाने थाटलेली आहेत.