वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:07+5:302021-06-06T04:26:07+5:30
विविध औषधीयुक्त व उपयोगी फळझाडांचे रोपण करण्यात आले. सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी बी. एन. पायघन, वनपरिक्षेत्र अधिकारी ई. पी. ...
विविध औषधीयुक्त व उपयोगी फळझाडांचे रोपण करण्यात आले. सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी बी. एन. पायघन, वनपरिक्षेत्र अधिकारी ई. पी. सोळंके, वनश्री पुरस्कार प्राप्त शिक्षक रवींद्र गणेशे, रमेश जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे पायघन यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाचे ए.एन.खरात, सतीश इंगळे, संजय दळवी, नीलेश राजपूत, प्रकाश चव्हाण, विकास किलबिले, दिलीप भोंबे, विश्वनाथ वाघोदे आदींची उपस्थिती होती.
वृक्षांमुळेच प्राणवायूची निर्मिती : पायघन
जागतिक पर्यावरण दिन हा कोरोना महामारीच्या काळात साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे. प्राणवायूची सर्वांना आवश्यकता आहे. कोरोना रुग्णांना प्राणवायू विकत घ्यावा लागत आहे, या समस्येची जाण ठेवून वृक्षांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. वृक्षांमुळेच मोठ्या प्रमाणात प्राणवायू वातावरणात निर्माण होतो. वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन व पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी १९७४ पासून जागतिक पातळीवर पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो, असे मत सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी बी. एन. पायघन यांनी व्यक्त केले.