तीन तास तबलावादन करून जागतिक संगीत दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:23 AM2021-06-24T04:23:37+5:302021-06-24T04:23:37+5:30
शारीरिक आणि मानसिक व्याधी कमी करण्यासाठी संगीत आणि योगा या दोन्हीचाही उपयोग होतो. यावर्षीच्या जागतिक संगीत दिनाच्यानिमित्ताने मेहकर येथील ...
शारीरिक आणि मानसिक व्याधी कमी करण्यासाठी संगीत आणि योगा या दोन्हीचाही उपयोग होतो. यावर्षीच्या जागतिक संगीत दिनाच्यानिमित्ताने मेहकर येथील राईतकर कुटुंबातील सर्व सदस्यांनी तीन तास तबलावादन करून जागतिक संगीत दिन साजरा केला.
यामध्ये तबलाविशारद, संगीत आचार्य रत्न (तबला) तथा राईतकर परिवाराचे कुटुंबप्रमुख भगवान राईतकर, त्यांच्या धर्मपत्नी गीता राईतकर आणि त्यांचे दोन मुले अथर्व राईतकर व यजुर्व राईतकर यांनी एकत्रितपणे तीन तास तबलावादन करून जागतिक संगीत दिन साजरा केला. दरवर्षी अनेक तबला साधकांना एकत्रित करून जागतिक संगीत दिन ते साजरा करीत असतात. परंतु कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये त्यांनी यावर्षी कौटुंबिक स्तरावर तीन तास तबलावादन करून जागतिक संगीत दिन साजरा केला आहे.
यावर्षीचा जागतिक संगीत दिन कसा साजरा करावा? असा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला आणि त्यामधून कुटुंबातील सर्व सदस्यांनी किमान तीन तास तबला वादन करून जागतिक संगीत दिन साजरा करण्याची कल्पना मनामध्ये आली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र तबलावादन केल्यामुळे एक वेगळा आनंद यानिमित्ताने अनुभवता आला.
- भगवान राईतकर, संगीत मार्गदर्शक.