सेंट्रल पब्लिक स्कूल येथे जागतिक आदिवासी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:52+5:302021-08-14T04:39:52+5:30
यावेळी प्राचार्य डॉ. जी. ई. निकस यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात ...
यावेळी प्राचार्य डॉ. जी. ई. निकस यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. जी. ई. निकस म्हणाले की, आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर डोंगर दऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा-नागडा, ओबड-धोबड चेहऱ्याचा, जगाशी कसल्याच प्रकारे संपर्क नसलेला असे चित्र दिसते. जगाच्या पाठीवर ज्या माणासाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. हे लोक प्राचीन काळापासून जंगलातच वास्तव्य करतात, जंगल हेच त्यांचे विश्व असल्याने जंगलाला, तसेच निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. जगाच्या पाठीवर आज ज्या कला आहेत त्या सगळ्या कलांचे मुळे हे आदिवासी लोकांपासून सुरू झालेले आहे. या दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा या अंतर्गत अकोला आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी शीतल रघुनाथ डाखोरे, शीतल रमेश डाखोरे, शुभांगी छगन डाखोरे यांनी गीतगायन केले असून, तर वैभव मनोहर गिऱ्हे, प्रथमेश संतोष शिंदे, योगेश महादेव खुळे, हरिओम वसुदेव गिऱ्हे या विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश त्रिकाळ, योगेश पऊळकर, सुरेश जमधाडे, प्रशांत इंगळे, मंगेश लंबे, गजेंद्र् धंडोरे, विजय खरबळ, संदीप अवसरमोल, रेखा माहोरे, वंदना ठाकरे, निशा काटकर, विमल माने, प्रज्ञा वानखेडे, आदी शिक्षक, तसेच अमोल काकडे, योगेश काळे, विशाल वाघोळे, अनिल चिखलेकर, संदीप सपकाळ, आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.