राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:28+5:302021-06-28T04:23:28+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा स्वातीताई पऱ्हाड ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेहकर शहर काँग्रेसचे अध्यक्ष कलीम खान ...

Celebrating the birth anniversary of Rajarshi Shahu Maharaj | राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

Next

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा स्वातीताई पऱ्हाड ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेहकर शहर काँग्रेसचे अध्यक्ष कलीम खान यांनी केले. स्वाती पऱ्हाड, सेवादल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शैलेश बावस्कर यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या महान सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात एनएसयूआयचे प्रदेश सचिव वसीम कुरेशी, संजय म्हस्के, प्रा. विनोद पऱ्हाड, वैभव उमाळकर, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा आरती दीक्षित, कुंडलिक देशमुख, रवी मिस्कीन, अक्षय इनकर, रियाज कुरेशी, दत्ता गिर्हे, मुनाफ खान, नारायण पचेरवाल, छोटू गवळी, सुखदेव ढाकरके, नारायण इंगळे, धर्मा बनचरे, शाहू गवळी, सादिक बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष युनूस पटेल यांनी केले. आभार शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. गोपाळ पाखरे यांनी मानले.

Web Title: Celebrating the birth anniversary of Rajarshi Shahu Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.