पारधी पाड्यावर दिवाळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:35 PM2017-10-22T23:35:16+5:302017-10-22T23:35:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: तालुक्यातील हिवरा खुर्द पासून जवळच असलेल्या पारडी या आदिवासीबहुल भागातील फासेपारधी पाड्यावर दिवाळीच्या दिवशी जाऊन कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांचेसोबत फराळाचा अस्वाद घेतला. एक आगळी-वेगळी दिवाळी आणि सामाजिक बांधीलकी जोपासत मेहकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष देवानंद पवार यांनी हा दिवाळी सण साजरा करण्याचा उपक्रम राबविला आहे. यावेळी उपस्थित पारधी बांधवांना कृष्णा हावरे यांनी मार्गदर्शन केले.
देवानंद पवार हे या भागातील गोर-गरीब आणि अनाथांचे नाथ मानले जातात. त्यांचे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविणे सुरूच असते. कुणाच्या घराला आग लागली असेल, त्याला आर्थिक मदत करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाची मदत मिळवून देणे, गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत करून योग्य मार्गदर्शन करणे, लाभार्थी कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम ते करीत आहेत. दिवाळीच्या महापर्वावर लाखो रुपयांचे फटाके आकाशात उड तात; मात्र अनाथ, गरीब, पारधी पाड्यावरील अविकसित मुले- मुली उपाशीपोटी झोपलेले असतात. त्यांच्या हृदयातच खरा देव आहे, अशा विचारसरणीतूनच ऐन दिवाळीच्या दिवशी १९ ऑ क्टोबरला पारधी पाड्यावर जाऊन तालुका अध्यक्ष देवानंद पवार यांनी गोड पदार्थ व भरगच्च फराळाचे वाटप केले.