खामगावात ईद उत्साहात साजरी; चांगल्या पावसासाठी मागितली दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:39 PM2019-06-05T12:39:17+5:302019-06-05T12:40:07+5:30
खामगाव : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर ५ जुनरोजी शहरातील मुस्लिम समाज बांधवानी सकाळी ९.१५ वाजता ईद-उल-फितरची नमाज अदा केली.
- योगेश फरपट
लोकमत न्युज नेटवर्क
खामगाव : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर ५ जुनरोजी शहरातील मुस्लिम समाज बांधवानी सकाळी ९.१५ वाजता ईद-उल-फितरची नमाज अदा केली. स्थानिक सजनपुरी स्थित ईद गाहवर सकाळपासूनच मुस्लीम समाज बांधवांनी गर्दी केली होती.
याठिकाणी फाटकपुरा मशीदीचे इमाम हाफिज सरफराज खान यांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. जिल्हयात चांगला पाऊस व्हावा, देशातून आतंकवाद समुळपणे नष्ट व्हावा. देशात शांती व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यासाठी दुवा करण्यात आली. याठिकाणी मुस्लीम समाज बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी खामगावचे आमदार अॅड. आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पुढारी पोहचले होते. काँग्रेस आणि भाजपच्यावतीने ईदगाहवर आलेल्या मुस्लिम समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. शहरासह संग्रामपूर, नांदुरा, शेगाव, मलकापूर, जळगाव आदी टिकाणी सुद्धा ईद उत्साहात व शांततेच्या वातावरणात साजरी झाली.