धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 08:33 PM2017-10-01T20:33:05+5:302017-10-01T20:34:25+5:30
धाड : स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ दसºयाचे दिवशी सकाही १० वा. बौध्द बांधवांचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार संग्राम पाटील, वैभव मोहिते, डॉ.विजय जट्टे, प्रभाकर जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथीचे हस्ते तथागत गौतम बुध्द व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

याठिकाणी मार्गदर्शन करताना ठाणेदार संग्राम पाटील यांनी सध्याचे सामाजिक स्थिती व स्पर्धेच्या युगात कुणीही समाधानी नसून अशांत आहे. भावी पिढीस व जगाला भविष्यात तथागत भगवान बुध्दांचे विचारसरणीची गरज आहे, जगात चालणाºया हिंसक वातावरणारत युध्दाची नव्हे तर जगाला बुध्दाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशांत बोर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित बौध्द उपासक व उपासीकेनी बुध्द वंदना केली. यावेळी शंकर थोरात, सत्यवान बोर्डे, आत्माराम बोर्डे, महेंद्र बोर्डे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे गौतम सपकाळ, अजय थोरात, पंकज बोर्डे, राहुल थोरात, शुभम बोर्डे, अक्षय बोर्डे, किरण थोरात, विनोद थोरात, संदिप बोर्डे, राजू ढवळे, उत्तम थोरात, अनिल बोर्डे, राम बोर्डे, भास्कर जाधव, उज्वल थोरात, श्रीकांत वाघ यांचेसह बौध्द बांधवांनी केले व परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सुनिल थोरात तर आभार गौतम सपकाळ यांनी केले.