विवेकानंद आश्रमात स्थापना दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:48+5:302021-01-16T04:38:48+5:30

१४ जानेवारी रोजी विवेकानंद आश्रमच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १४ जानेवारी १९६५ ला मकरसंक्रांतीच्या शुभ महूर्तावर ...

Celebration of Foundation Day at Vivekananda Ashram | विवेकानंद आश्रमात स्थापना दिन साजरा

विवेकानंद आश्रमात स्थापना दिन साजरा

Next

१४ जानेवारी रोजी विवेकानंद आश्रमच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १४ जानेवारी १९६५ ला मकरसंक्रांतीच्या शुभ महूर्तावर विवेकानंद आश्रम नावाच्या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून आज कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आणण्याचे महान कार्य होऊ शकले. हे कार्य पुढे नेण्यासाठी विवेकानंद आश्रमच्या कार्यकारी मंडळ, हितचिंतक व भाविकांनी अविरत जनसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. संस्थेच्या कार्याचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू असे मत विवेकानंद आश्रमचे सचिव संतोष गोरे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिसरात स्वच्छता करण्यात आली. समाधिस्थळी पूजन करण्यात येऊन उपस्थितांना तीळगूळ वाटण्यात आले. कार्यक्रमाला आश्रमचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, दादासाहेब मानघाले, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, विश्‍वस्त पुरुषोत्तम आकोटकर, नारायण भारस्कर, संतोष थोरहाते, शे. ना. दळवी, बेलाप्पा धाडकर, राजेश रौंदळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Celebration of Foundation Day at Vivekananda Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.