विवेकानंद आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:32+5:302021-07-26T04:31:32+5:30

शुकदास महाराजांनी समाजाच्या उत्कर्षासाठी सुरू केलेला विवेकानंद आश्रम हा गुरुप्रतिची कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे. गुरू हा केवळ मानवी ...

Celebration of Gurupournima at Vivekananda Ashram | विवेकानंद आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

विवेकानंद आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

googlenewsNext

शुकदास महाराजांनी समाजाच्या उत्कर्षासाठी सुरू केलेला विवेकानंद आश्रम हा गुरुप्रतिची कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे. गुरू हा केवळ मानवी देहधारी व्यक्ती असतो, असे नव्हे तर ते एक अरूप तत्त्व असते. गुरुत्वाच्या तत्त्वांचे आचरण ही श्रेष्ठ पूजा आहे. त्यानिमित्ताने आश्रमात रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कोरोनानंतरचे आजार, स्त्रियांचे आजार, बालरोग निदान, नेत्रतपासणी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ८ वाजता डॉ. आशिष चांगाडे यांनी रुग्ण तपासणी करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. त्यात २१२ रुग्णांनी तपासणी करून घेतली. यावेळी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदवी वितरण समारंभात ४३ विद्यार्थ्यांना विज्ञान स्नातकाची पदवी वितरण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. डी. पाटील हे होते.

गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गुरुपौर्णिमेनिमित्त हिवरा आश्रम येथे विविध कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी सकाळी ६ वाजता हरिहर तीर्थावर सकाळी ७ वाजता परिसराची स्वच्छता करून ग्रामसफाई करण्यात आली. ७.३० वाजता हरिहर तीर्थावर महाआरती करण्यात आली. ९ वाजता महाराजश्रींच्या समाधिस्थळावर पूजन करण्यात आले. विवेकानंद स्मारकावरील विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांच्या हस्ते प्रतिमांची विधिवत पूजा करण्यात आली. भाविकांनी आश्रमात गर्दी न करता आपल्या घरी राहूनच गुरुप्रतिमेचे पूजन करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. त्याला भाविकांच्या वतीने प्रतिसाद देण्यात आला.

Web Title: Celebration of Gurupournima at Vivekananda Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.