सिमेंट दरवाढीचा बांधकाम व्यवसायाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 02:43 PM2019-05-03T14:43:47+5:302019-05-03T14:44:01+5:30
बुलडाणा: सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रती बॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रती बॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची ओरड बांधकाम व्यावसायिकांमधून होत असून प्रसंगी या विरोधात तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा क्रेडाईने दिला आहे.
या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह, बांधकाम व्यावसायिक तथा मजूर वर्गावरही विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितल्या जात आहे. सिमेंट कंपन्यांनी सिमेंट विक्री दरामध्ये अवास्वत वाढ केली असल्याचे क्रेडाई संघटनेचे म्हणे आहे. प्रकरणी क्रेडाईचे अध्यक्ष सुमीत सरदार, उपाध्यक्ष अविनाश सातपुते, मधुकर जोगंदड, एस. व्ही. कोलते, आतिक खान, श्याम सावळे, गोपाल पंडीत, गौरव टाकसाळ, तजीम मिर्झा, अतिश कस्तुरे, विजय खंडागळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना याबाबत एक निेदनही दिले आहे.
दरम्यन केंद्र शासनाने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश या दरवाढीमुळे काही प्रमाणात अडचणीत आलेला आहे. सिमेंट दरवाढीमुळे केवळ बांधकाम व्यवसायच नव्हे तर मुलभूत व पायाभूत सुविधा पुरविणार्या व्यवसायावर ही विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास ११ टक्के योगदान बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून दिले जाते. सोबतच याच क्षेत्रात सध्या सर्वाधिक रोजगार असून सामान्य मजुराची उपजिविकाही या व्यवसायावर अवलंबून आहे.
प्रकरणी ही दरवाढ मागे घेण्यात यावी तथा मजूर वर्गापासून व्यावसायिकांनाही दिलासा द्यावा, अन्था क्रेडाईकडून तीव्र आंदोलन छेण्यात येईल, असा इशारा क्रेडाईचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुमीत सरदरा यांनी दिला आहे.
गृहनिर्माण क्षेत्राच्या पतपुरवठ्यात ४२ टक्के वाढ
यंदाच्या वार्षिक पतआराखड्यात प्रथमच सात टक्के तरतूद ही गृहनिर्माण क्षेत्रासाठी करण्यात आली असून २६८ कोटी रुपये चालू आर्थिक वर्षात या क्षेत्रात पतपुरवठा करण्याचे बँकिंग सेक्टरचे उदिष्ट आहे. यंदा प्रथमच गृहनिर्माण क्षेत्रात पतआराखड्याच्यामध्ये उपरोक्त तरतूद करण्यात आली असून गेल्या वर्षीच्या आराखड्याच्या तुलनेत त्यात ४२ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातच आता सिमेंटच्या किंमतीत वाढ झाल्याने गृहनिर्माण क्षेत्राला याचा प्रामुख्याने फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामस्वरुप गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्के करण्यात आलेली वाढ कितपत या क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते हे येत्या काळात स्पष्ट होईल.