स्मशानभूमीचे सुशोभिकरण व वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:23 AM2021-07-21T04:23:30+5:302021-07-21T04:23:30+5:30
येथील राऊतवाडी स्मशानभूमी सौंदर्यीकरणापश्चात दुर्लक्ष झाल्याने येथे असुविधा वाढल्या होत्या. याची दखल घेत प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे व नगरसेविका प्रा.मीनल ...
येथील राऊतवाडी स्मशानभूमी सौंदर्यीकरणापश्चात दुर्लक्ष झाल्याने येथे असुविधा वाढल्या होत्या. याची दखल घेत प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे व नगरसेविका प्रा.मीनल गावंडे या दाम्पत्याने पुढाकार घेत स्वखर्चातून स्मशानभूमीतील असुविधा दूर करण्यासह सुशोभिकरणाचे काम चालविले आहे. या अंतर्गत स्मशानभूमीत स्थित भव्य महादेव मूर्तीची रंगरंगोटी, स्वच्छता, दहनशेडची दुरुस्ती व सुशोभिकरण आदींसह मोठ्या प्रमाणावर नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस पाहता स्मशानभूमीच्या सौंदर्यात व वैभवात पर पडतील अशी फळे, फुलांसह वड, पिंपळ, कडूनिंब, बेल आदी पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड १९ जुलै रोजी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, दत्ता सुसर, गजानन महाराज भक्त मंडळाचे विश्वस्त सुनील मोडेकर, किरण पवार, सुप्रभात ग्रूपचे महेश महाजन, अनिल वाधवाणी, सागर डहाळे, सुधीर चेके पाटील, स्व.सेठ ब्रिजमोहन लढ्ढा फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष लढ्ढा, राऊत इन्शुरन्सचे संचालक मनोज राऊत, शैलेश आंभोरे, प्रा.प्रकाश देशमाने, सुनील देशमाने, शिवा राजपूत, चेतन माळी, मंगेश भुतेकर, बंडू कदम, सुनील इंगळे, प्रल्हाद बोर्डे, राहुल वानखेडे, विशाल पवार, प्रदीप ठाकरे आदी उपस्थित होते.
गावंडेंच्या पुढाकाराने मिळाली जागा!
स्थाानिक राऊतवाडी परिसरात स्मशानभूमीअभावी अंत्यविधीसाठी मोठा त्रास सोसावा लागत होता. त्यानुषंगाने या भागात स्मशानभूमीच्या निर्मितीसाठीही तत्कालीन नगरसेवक प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे यांनी पुढाकार घेत स्मशानभूमीसाठी जागा मिळवून दिली होती. त्या पश्चात स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीसाठीदेखील सातत्याने ते प्रयत्न करीत आहेत़