ओबीसीची जनगणना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:48+5:302021-07-16T04:24:48+5:30
करावे, अशी मागणी राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ओबीसीकरिता कलम ३४० नुसार जातनिहाय जनगणना करणे ...
करावे, अशी मागणी राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ओबीसीकरिता कलम ३४० नुसार जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. ओबीसीची लोकसंख्या स्पष्ट होईल. जनगणना हे राष्ट्रीय कार्य असून, याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे. आरक्षण हे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या विभागातून मिळायला हवे, परंतु १९३२ नंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच नाही. नाभिकांसाठी उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांची उभारणी करण्यात यावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण व तंत्र शिक्षणाची सोय, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा, वसतिगृह काढावीत, यासह विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय नाभिक संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रकाश सवडतकर, हरिदास जाधव, दत्तात्रय मोतेकर, जगदीप चवरे, एकनाथ राऊत, विलास चिमे आदींच्या सह्या आहेत.