केंद्र बंद, आधारकार्ड दुरुस्तीसाठी अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:34 AM2021-03-18T04:34:25+5:302021-03-18T04:34:25+5:30
गॅस दरवाढीमुळे पुन्हा ग्रामीण भागात पेटल्या चुली ! जानेफळ : केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरात मोफत गॅस ...
गॅस दरवाढीमुळे पुन्हा ग्रामीण भागात पेटल्या चुली !
जानेफळ : केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरात मोफत गॅस जोडणी दिली आहे. मात्र, आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने गॅस शेगडी व सिलिंडर घरात एक शोभेची वस्तू बनली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे.
परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी
मेहकर : कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शालेय परीक्षा ऑनलाईन घ्याव्या, अशी मागणी सचिन मोतेकर यांनी केली आहे. शिवाय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढली आहे. त्यामुळे सर्व परीक्षा ऑनलाईन होणे आवश्यक आहे.
शुटींग बॉल स्पर्धेत अमडापुरच्या मुलींचे यश
अमडापूर: बिहारमध्ये झालेल्या ३९ व्या ज्युनियर नॅशनल शुटींग बॉल स्पर्धेत विदर्भाच्या संघाने तिसरे स्थान पटकावले असून या स्पर्धेत विदर्भाकडून खेळताना अमडापुरच्या मुलींनी चमकदार कामगिरी गेली.
वीज देयकांसह कर माफ करण्याची मागणी
बुलडाणा : शहरातील गोरगरीब जनतेचे वीजबिल, नगरपालिकेचा सर्व प्रकारचा कर माफ करून त्यांना ३ महिन्याचे राशन देण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
हरभरा काढणीच्या कामांना आला वेग
मासरूळ : हरभरा काढणीच्या कामांना आता वेग आला आहे. काही भागात हरभरा काढणीचे कामे अंतिम टप्प्यात आली असून, गहू व रब्बी ज्वारी काढणी, मळणीच्या कामासही वेग आला आहे.
पोषण आहार कामगारांचे मानधन रखडले
जानेफळ : शालेय पोषण आहार कामगारांना त्यांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे हे कामगार अडचणीत सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने शालेय पोषण आहार कामगारांना मानधन द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
धामणगाव धाड : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून धाड-करडी रस्त्यावर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.
शिंदी ते मेरा खुर्द रस्त्याची दुरवस्था
साखरखेर्डा : साखरखेर्डा ते मेरा चौकी या १८ किमीच्या रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
अभ्यासक्रम अपूर्ण, विद्यार्थ्यांचा गोंधळ
बुलडाणा : परीक्षेच्या तोंडावर दहावीचे वर्गही सुरू करण्यात आले. आता परीक्षा जवळ आलेल्या असताना अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांची झाली. अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.
भुरटे चोर सक्रिय, चोरीच्या घटनांमध्ये वाढ
बुलडाणा : परिसरात सध्या दुचाकी लंपास होण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
लघु प्रकल्पांच्या संख्येत होणार वाढ
बुलडाणा : लघु पाटबंधारे विभाग अंतर्गतचे बांधकाम अधीन दिग्रस कोल्हापुरी बंधारा, चौंढी बृहत लघु प्रकल्प, आलेवाडी, दुर्गबोरी लघु प्रकल्प हे प्रकल्प लवकरच पूर्ण होत आहेत. त्यामुळे बुलडाणा पाटबंधारे विभागांतर्गत या प्रकल्पांची संख्या वाढणार आहे.