केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. जाधव यांचा दाैरा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:36 AM2021-01-19T04:36:08+5:302021-01-19T04:36:08+5:30
चिखली : केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांच्या ग्रामविकास समितीचा पहिल्या दौऱ्यास श्री तिरुपती बालाजींच्या दर्शनाने झाली ...
चिखली : केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांच्या ग्रामविकास समितीचा पहिल्या दौऱ्यास श्री तिरुपती बालाजींच्या दर्शनाने झाली आहे.
खा. जाधव अध्यक्ष असलेल्या केंद्रीय ग्रामविकास समितीतील सहकारी सदस्य असलेल्या १३ खासदार आणि ४ अधिकाऱ्यांबराेबर आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात हा अभ्यास दौरा काढण्यात आलेला आहे. १६ जानेवारी रोजी याची बालाजी दर्शनाने सुरुवात झाली आहे.
श्री तिरुपती बालाजीचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक दर्शन घेतल्यानंतर या दौऱ्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यासमवेत केंद्रीय ग्रामविकास समितीचे सदस्य खासदार राजवीर दिलेर, खा. समशेरसिंग दुल्लोखा, श्यामसिंग यादव, खा. नाझीर अहमद, खा. तलारी रंगेह, खा. एकेपी चिनराज, खा. विवेक शेजवळकर, खा. माला राजा शाह, खा. सुजित कुमार, खा. इराना कडाडी, खा. सी.एन.अण्णादुराई, खा. जनार्धन मिश्रा या खासदारांसह सहसचिव डी.आर. शेखर, उपसचिव निशांत मेहरा, अंडर सेक्रेटरी नागेंद्र सुमन, समिती अध्यक्ष खा. जाधव यांचे स्वीय सहायक राहुल सोळंकी आणि रिपोर्टिंग ऑफिसर अतुल सिंग यांचा समावेश आहे.
आ. रायमुलकरांची उपस्थिती
केंद्रीय ग्रामविकास समितीच्या या दौऱ्यात तिरुपती बालाजीपर्यंत पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर, रंजना रायमुलकर, नीरज रायमुलकर, डॉ. कु. नयना रायमुलकर, प्रा.डॉ. सचिन जाधव, प्रवीण जाधव, स्वीय सहायक रूपेश गणात्रा यांचीदेखील उपस्थिती होती.