केंद्रीय पथक आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौ-यावर
By Admin | Published: December 15, 2014 12:32 AM2014-12-15T00:32:28+5:302014-12-15T00:58:41+5:30
जिल्ह्यातील सिंदखेडराजा, मेहकर व लोणार तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याची दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे सचिवस्तरीय पथक बुलडाणा जिल्ह्यात आज १५ डिसेंबर रोजी दाखल होणार आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा, मेहकर व लोणार तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार असून, पाहणी दौर्यानंतर आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्यांना होईल असा अहवाल देतील, अशी अपेक्षा आहे. सचिव दर्जाचे अधिकारी प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पथक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी क रणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यात अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग या पिकांचे ७0 टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.