बुलडाणा तालुक्यात कोरोनाचे शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:33+5:302021-05-06T04:36:33+5:30

कैरीचे भाव वाढल्याने खरेदीवर परिणाम बीबी : दरवर्षीच्या तुलनेत यंदा गावरान आंबा कमी प्रमाणात आल्याने कैरीचे भाव वाढले आहेत. ...

Century of Corona in Buldana taluka | बुलडाणा तालुक्यात कोरोनाचे शतक

बुलडाणा तालुक्यात कोरोनाचे शतक

Next

कैरीचे भाव वाढल्याने खरेदीवर परिणाम

बीबी : दरवर्षीच्या तुलनेत यंदा गावरान आंबा कमी प्रमाणात आल्याने कैरीचे भाव वाढले आहेत. आंब्याचे उत्पादन कमी झाल्याने भाव वाढले आहेत. नागरिकांकडून कैरीला चांगली मागणी असते. मात्र दर वाढल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे.

लॉकडाऊनच्या नियमांकडे होतेय दुर्लक्ष

सुलतानपूर : लॉकडाऊनच्या नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. फिजिकल डिस्टसिंग पाळणे, मास्क वापरणे, साबणाने हात धुणे गरजेचे आहे. परंतु नागरिक सर्रास रस्त्यावर गर्दी करीत आहेत. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.

उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त

हिवरा आश्रम : वातावरणातील उकाडा प्रचंड वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा तर घरात पंखा, कुलर नसताना थांबणे अवघड झाले आहे. रात्रीही प्रचंड उकाडा जाणवत आहे. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

साखरखेर्डा स्टेट बँकेसमोर ग्राहकांची गर्दी

साखरखेर्डा : येथील भारतीय स्टेट बँकेच्या समोर सकाळी एकच गर्दी उसळल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी समयसुचकता पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

सांडपाण्याचा निचरा करण्याची मागणी

डोणगाव : नालीतील सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. ग्रा. पं. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

बसमध्ये केवळ एक ते दोन प्रवाशी

बुलडाणा : लॉकडाऊनमुळे बससेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. केवळ दोन ते तीन प्रवाशी बसमधून प्रवास करीत आहेत. कोरोनाच्या धास्तीने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील बसस्थानक सामसूम आहे.

पीक कर्जासाठी मिळेना कागदपत्र

बुलडाणा : पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मागणी अर्ज भरून व या अर्जासोबत सातबारा, नमुना आठ अ यासह विविध आवश्यक कागदपत्रांची मागणी बँकेत केली जात आहे. परंतु लॉकडाऊनमुळे काही कागदपत्र मिळणे अवघड झाले आहे. तलाठी वेळेवर मिळत नाहीत.

माळविहीर येथे पथदिव्यांचा अभाव

बुलडाणा : शहराला लागून असलेल्या माळविहीर येथे काही भागात पथदिव्यांचा अभाव आहे. यामुळे संबंधित परिसरात रात्री नेहमीच अंधार राहतो. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या भागात पथदिवे बसवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ग्राहकांना आर्थिक फटका

बुलडाणा : कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या नावाखाली जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकानदार चढ्या दराने विक्री करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

डंपिंग ग्राऊंड हाऊसफुल्ल

बुलडाणा : शहरातीलच नव्हे तर इतर शहरातील कचरा टाकण्यात येत असलेले डंपिंग ग्राऊंड आता हाऊस फुल्ल झाले आहे. यामुळे शहरातून जाणारा कचरा चक्क रस्त्यावर टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.

नालेसफाईची कामे अपूर्ण

बुलडाणा : बुलडाण्यातील नाले सफाईचे काम अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. सध्या अर्ध्यापेक्षा कमी काम झाले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने कामांना नाले सफाईच्या कामांना आता वेग देण्याची गरज आहे.

दरेगावसाठी टँकर मंजूर

सिंदखेड राजा : तालुक्यातील दरेगाव येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणी पुरवठाकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. दरेगाव येथील २ हजार ३२८ लोकसंख्या करिता एक टँकर ६२ हजार ४२० लिटर पाणीपुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी.

Web Title: Century of Corona in Buldana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.