श्वासानंद माउलींचा समाधी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 01:47 PM2020-01-27T13:47:48+5:302020-01-27T13:47:58+5:30
प.पू. श्वासानंद माउलींचा संजीवन समाधी उत्सव खामगाव येथील श्री श्वासानंद सेवाश्रम खामगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: प.पू. श्वासानंद माउलींचा संजीवन समाधी उत्सव खामगाव येथील श्री श्वासानंद सेवाश्रम खामगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या महोत्सवात २१ जानेवारी रोजी धर्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या पादुकेला ११ पुरूष सुक्त आर्वतनात पूजन अभिषेक महाजन आणि आरती महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. दुपारी मलकापूर येथील प्रमोद डोखे तर सायंकाळी हभप नारायणदास पाठक यांचे प्रवचन आणि हरीकिर्तन पार पडले. २२ जानेवारी रोजी मुख्य संजीवन समाधी तिथीला प्रसाद महाजन, पुणे व मनिष पुजारी तसेच १०८ भक्तांकडून श्री संजय महाराज महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर हभप जयंत महाराज हरिदास यांचे प्रवचन झाले. प्रवचनानंतर मुळ पादुकेचा नेत्रदीपक पालखी सोहळा पार पडला. यात मुख्य ध्वज, अश्व, टाळकरी, भाविक मोठ्यासंख्येने सहभागी झाले. ही मिरवणूक केलानगर, सिव्हील लाईन, टॉवर, कोर्ट , नाका मार्गे पालखीचा श्री गुरूपीठात समारोप झाला. रात्री डॉ. मोहन महाराज देवघरे यांचे किर्तन झाले. २३ जानेवारी रोजी २१ भक्तांनी श्री गुरू चरित्राचे पारायण केले. गोपालकाल्याचे कीर्तन हभप संतचरणदास निकम गुरूजी, देऊळगाव राजा यांनी केले. शेवटी महाप्रसादाने संजीवन समाधी उत्सवाची सांगता झाली. यावेळी हभप तुळशीराम महाराज वानखडे, निवृत्तीबुवा काळे, किसन महाराज चोपडे, सुपेकर महाराज यांची उपस्थिती होती. या महोत्सवात वैजनाथ कुळकर्णी, शुभांगी पिसे, उध्दव कापडे, कल्याणी कुळकर्णी यांनी सेवा दिली.