शेतकऱ्यांच्या बँकेत चकरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:46+5:302021-06-25T04:24:46+5:30
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान किनगाव राजा : परिसरात खरीप पीक उगवण्यास सुरूवात झाली आहे. परंतु हरीण, रोही यांचा वावर वाढला ...
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान
किनगाव राजा : परिसरात खरीप पीक उगवण्यास सुरूवात झाली आहे. परंतु हरीण, रोही यांचा वावर वाढला असून छोट्या छोट्या रोपट्यांवर वन्य प्राणी ताव मारत असल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे
लोणार : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगरसेवक डॉ. अनिल मापारी यांनी केले आहे. आता कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात आली असून, लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या लसीकरण सुरू आहे.
मेहकर तालुक्यात दोन पॉझिटिव्ह
मेहकर : तालुक्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गुरूवारी सापडले. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. संसर्ग कमी झाल्याने नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन ही होत आहे.
अन्न व औषध विभागात रिक्त पदे
बुलडाणा : अन्न व औषध प्रशासन विभागात अनेक रिक्त पदे आहेत. हे रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यासाठी शासन सकारात्मक असून लवकरच रिक्त पदांची भरती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.