पॉझिटिव्हिटी रेट नियंत्रणात आणण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:45+5:302021-05-26T04:34:45+5:30
गेल्या आठ दिवसांतील पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला आहे. २५ मे रोजी तो तो ९.०८ आहे. त्यामुळे जिल्ह्याची स्थिती ...
गेल्या आठ दिवसांतील पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला आहे. २५ मे रोजी तो तो ९.०८ आहे. त्यामुळे जिल्ह्याची स्थिती सुधारत असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती म्हणाले.
त्यामुळे १ जूननंतर जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता मिळेल का, याबाबत विचारणा केली असता टप्प्याटप्प्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार त्यात शिथिलता मिळले. मात्र, त्यासाठी शारीरिक अंतर पाळणे, मास्क घालणे आणि नियमित हात धुणे या त्रिसूत्रीचे जनसामान्यांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
--पायाभूत सुविधांवर भर--
संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य देण्यात आले. व्हेंटिलेटर्स, सीसीसी, कोविड हाॅस्पिटल व ग्रामीण भागात विलगीकरण कक्षही उभारण्यात आले आहेत. यासोबतच चार खासगी कोविड रुग्णालयांसह शासकीय ७ रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांट निर्मितीचेही काम वेगाने सुरू आहे. वर्तमान स्थितीत यापैकी पाच ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झालेले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
--टास्क फोर्सचे गठण--
म्युकरमायकोसिस आजाराच्या संदर्भाने उपाययोजना व उपचार करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय टास्क फोर्स गठित करण्यात आला असून, कोरोनाबाधित लहान मुलांवर नेमके कोणते व कसे उपचार करावेत, याबाबतचाही जिल्हास्तरीय टास्क फोर्स गठित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कोरोना व्हायरसच्या नवीन म्युटेशनचा लहान मुलांना धोका असण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व बालरोग चिकित्सकांची एक कार्यशाळाच प्रशासन घेणार असल्याचे ते म्हणाले.