चांधई ग्रामपंचायत अविरोध! - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:19+5:302021-01-08T05:53:19+5:30
मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सामंजस्याने व अविरोध पार पाडाव्यात, असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केले होते. तथापि, अविरोध निवडणूक ...
मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सामंजस्याने व अविरोध पार पाडाव्यात, असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केले होते. तथापि, अविरोध निवडणूक पार पाडणाऱ्या ग्रामपंचायतींना २१ लाखांच्या निधीची घोषणादेखील केली आहे. या आवाहनास चांधई ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येथील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येत चांधई ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध केली. यामध्ये वॉर्ड क्रमांक १ मधून कृष्णा शालिकराम तेलंग्रे, स्वाती संदीप वानखेडे, सुनंदा परमेश्वर सोळंके, वाॅर्ड क्रमांक २ मधून विशाल भाऊराव इंगळे, सविता सुरेश इंगळे, कोकिळा प्रतापसिंह सोळंके, वाॅर्ड क्रमांक ३ मधून अनसूया दगडू सोळंके, पूजा अनिल गिरी, गणेश देवराव सवडतकर हे नऊ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. निवडणूक अविरोध होण्यासाठी गावातील माजी सरपंच मधुकर सोळंके, सुनील रगड, रामसिंग सोळंके, शालिकराम तेलंग्रे, निवृत्ती सोळंके, माधवर सोळंके, किशोर जाधव, नागोराव इंगळे, अशोक इंगळे, ज्ञानदेव सोळंके, रतन कतोरे, गजानन सोळंके, संजय सोळंके, संजय गिरी, फुलसिंग सोळंके, अविनाश सवडतकर, बबन इंगळे, परमेश्वर सोळंके, जनार्दन सोळंके, पोलीसपाटील दलसिंग सोळंके, दिगंबर कळमकर, किशोर सोळंके, रमेश सोळंके, आश्रृगीर गिरी, प्रताप सोळंके, प्रकाश इंगळे, बाळू सोळंके, ज्ञानेश्वर सोळंके, गणेश इंगळे, नागोराव इंगळे, अनिल इंगळे, विजय सोळंके, संजय जाधव, शिवदास सोळंके, राजू जाधव, सुनील इंगळे, लक्ष्मण सोनुने, अमोल इंगळे, देवानंद रगड, राजू इंगळे, विजय इंगळे यांनी परिश्रम घेतले.