परिवर्तनवादी चळवळींनी वैचारिकच राहावे
By admin | Published: April 15, 2015 01:03 AM2015-04-15T01:03:53+5:302015-04-15T01:03:53+5:30
लोकमत परिचर्चा; उत्तम आरोग्य ही सर्वांंचीच जबाबदारी असल्याचे मत.
बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित समाजालाच नव्हे, तर प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता यावं, यासाठी समता, बंधुत्व, न्यायावर आधारित भारतीय राज्य घटनेची निर्मिती केली. त्यांचे कार्य हे पुरोगामी चळवळी साठी प्रेरणादायी असेच आहे त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींची गती या संदर्भात मंगळवारी लोकमतह्ण ने परिचर्चेचे आयोजन केले होते. यामध्ये समाजातील आंबेडकरी विचारवंत, प्राध्यापक, सामाजीक कार्यकर्ते यांनी या चळवळींनी वैचारीक आधार जपावा असा मोलाचा सल्ला दिला.
परिचर्चेत पुरोगामी चळवळची दशा व दिशा याबाबत विचार व्यक्त केले. चर्चेची सुरवात करतांनाच ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते यांनी सत्य शोधक समाज चळवळीतील अनेक अनुभव सांगुन अशा चळवळींनी समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगीतले.तसा आदर्श आजच्या किती चळवळी समाजासमोर ठेवतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुरेश साबळे यांनी आंबेडकरी विचाराधारा व त्यांची उपयुक्तता विषद करून अशा चळवळींची पुष्ठभूमी तयार झाली पाहिजे असे सांगीतले. प्रा.डॉ.येरणकर यांनी महाविद्यालयातुन बंद झालेल्या निवडणुकांमुळे युवकांचे नेतृत्व घडत नाही. व जे तयार हो ते ते पक्षीय नेतृत्व राहते त्यासाठी वैचारीक आधार कोणता? असे स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.म्हळसणे यांनी समाज प्रबोधानाची सुरवातही स्व:तापासुन केली पाहिजे असा आग्रह धरला. शाहिर इंगळे यांनी आंबेडकरी चळवळीतील अनेक अनुभव सांगत या चळवळी थांबणार्या नाहीत फक्त त्यांना प्रतिगामी शक्तींचा धोका असल्याची भिती व्यक्त केली. गायकवाड यांनी डाव्या विचारसरणींच्या संघटनांचे कार्य सांगतांनाच पुरोगामी चळवळींनी अधिक व्यापक होण्याची गरज व्यक्त केली. या सर्व मान्यवरांनी या चळवळींनी आपला वैचारीक आधार हरविता कामा नये हे ठामपणे सांगीतले. वैचारीक अधारावरच अशा चळवळी मोठया होतील व प्रतिगामी शक्तींना अटकाव घालतील असा आशावाद सर्वानी व्यक्त केला.