खामगाव तालुक्यातील कृषी विभागाचा कारभार ‘प्रभारीं’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:35 PM2019-01-29T14:35:57+5:302019-01-29T14:36:32+5:30
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या खामगाव तालुक्यातील कृषी विभागाचा कारभार प्रभारींच्या भरवश्यावर सुरू असल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या खामगाव तालुक्यातील कृषी विभागाचा कारभार प्रभारींच्या भरवश्यावर सुरू असल्याचे दिसून येते. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील महत्वाच्या पदांसह विविध महत्वपूर्ण जबाबदारी असलेली विविध पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे या कार्यालयात कार्यरत एका कर्मचाºयांकडे तीन-तीन पदांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खामगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, सहा. अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अनुरेखक, वाहन चालक, शिपाई/ पहारेकरी अशी विविध ६७ पदे मंजूर आहेत. मात्र, तालुका कृषी अधिकाºयांसह तब्बल १६ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने, या कार्यालयातील कार्यरत कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. अशीच परिस्थिती उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातही असून, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात उपविभाविभागीय कृषी अधिकाºयांचे पद ३१ जानेवारी २०१७ पासून रिक्त आहे. म्हणजेच ए.आर. बोंडे सेवानिवृत्त झाल्यापासून या कार्यालयाचा कारभार प्रभारींच्याच भरवश्यावर सुरू आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळे तालुका कृषी आणि उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील काही कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा कृषी अधिकारी कार्यालयात वर्तुळात होत आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात रिक्त पदे
उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात तंत्रअधिकारी, कृषी अधिकारी, वरिष्ठ लिपिक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, अनुरेखक, जिप चालक, रोपमळा मदतनीस, शिपाई, चौकीदार, ग्रेड-१ मजूर अशी विविध ५१ पदे मंजूर आहेत. यापैकी उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी अशी प्रत्येकी १ तर कृषी पर्यवेक्षकांची-०६, लिपिक-१, अनुरेखक-०२, चालक-०१, रोपमळा मदतनीस-०५, शिपाई-०५, ग्रेड-१ मजूर- ०८ अशी एकुण ३२ पदे रिक्त आहेत. बदली, पदोन्नती आणि सेवानिवृत्ती झालेली विविध पदे १ जुलै १९९८ पासून रिक्त असल्याचे दिसून येते.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात १६ पदे रिक्त!
खामगाव येथील तालुका कृषी अधिकारी एम.डी. जाधव ३१ आॅगस्ट २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कामकाज प्रभारींच्या भरवश्यावर सुरू असून, सद्यस्थितीत तालुका कृषी अधिकाºयांचे पद रिक्त आहे. कृषी अधिकाºयानंतर कृषी पर्यवेक्षकांच्या मंजूर ०७ पदापैकी ०३ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे ३ अनुरेखक, ०२ कृषी सहाय्यक, ०१ वाहन चालक आणि शिपाई/पहारेकºयाचे ०६ पदे मिळून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल १६ पदे रिक्त आहेत.
कृषी कार्यालय चपराशाविणा !
खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शिपाई/ पहारेकºयाची सहा पदे मंजूर आहेत. सहापैकी काही कर्मचारी सेवानिवृत्त तर काही कर्मचाºयांना टप्प्या-टप्प्याने पदोन्नती मिळाली आहे. मात्र, त्यांच्या रिक्तजागी नवीन कर्मचाºयांची अद्यापपर्यंत नियुक्ती झाली नाही. परिणामी, ३ सप्टेंबर २०१८ पासून एकही शिपाई/ पहारेकरी नाही. तसेच ३० जून २०१५ पासून कृषी अधिकारी कार्यालयात चालकही नसल्याचे दिसून येते. तालुका कृषी कार्यालयाचे वाहन चालक पी.जे.कुयटे ३० जून २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले होते. हे येथे उल्लेखनिय!