श्रध्देचा अभिषेक करीत गडकऱ्यांनी ओढल्या गाड्या्, खामगाव आणि जनुना येथे चैत्र पोर्णिमेचा उत्साह शिगेला
By अनिल गवई | Published: April 6, 2023 07:51 PM2023-04-06T19:51:37+5:302023-04-06T20:17:29+5:30
असा त्यांचा क्रम सर्व गाडे मंदिरापर्यंत सुरू होता. यावेळी डफड्याच्या गजरात भाविक हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करीत होते.
खामगाव: श्रध्दा...भक्ती आणि सातत्याची अनोखी त्रिसुत्री असलेल्या चैत्र नवमीचा उत्सव खामगावात पार पडला. यावेळी गडकर्र्यांनी (गाडे ओढणारे) भक्तीचा अभिषेक करीत कठीण परिश्रमातून गाड्या ओढून खंडेरायांवर श्रध्दा अर्पण केली. खामगाव शहरातील जगदंबा रोड आणि तालुक्यातील जनुना येथे १२ गाड्या ओढण्याचा अनोखा उत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने गुरूवारी सायंकाळी पार पडला.
जगदंबा रोडवर खंडोबाचे पुरातन ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिरात गत दीडशे वर्षांची परंपरा असलेला गाड्या ओढण्याचा उत्सव साजरा करण्यात येतो. चैत्र पोर्णिमेपूर्वी मंदिरात घट स्थापना केली जाते. त्यानंतर चैत्र नवमीच्या अडीच दिवस आधी गडकर्यांची हळद माखणी आणि मिरवणूक काढण्यात येते. चैत्र नवमीला खामगाव येथील गौतम चौकातून जगदंबा मंदिरापर्यंत तर जनुना येथील रेणुका माता मंदिर परिसरात १२ गाड्या ओढल्या जातात. परंपरेनुसार गुरूवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या साक्षीने भाविक आणि बच्चे कंपनी बसलेल्या गाड्या डफड्याच्या गजरात ओढल्या. हा सोहळा याची देही याची डोळा साठविण्यासाठी दोन्ही िठकाणीभाविकांची मोठी गर्दी जमली होती.
हळदीच्या भंडाऱ्याची उधळण- १२ गाड्या ओढण्यासाठी गडकरी गौतम चौकापर्यंत वाजत गाजत येत होते. ठराविक अंतरापर्यंत गाडे ओढून पुन्हा वाजत गाजत जगदंबा मंदिरापर्यंत जात होते. दर्शन घेतल्यानंतर पुन्हा गाडे ओढण्यासाठी गौतम चौकात येत हाेते. असा त्यांचा क्रम सर्व गाडे मंदिरापर्यंत सुरू होता. यावेळी डफड्याच्या गजरात भाविक हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करीत होते.