‘रेमडेसिविर’ची स्वस्ताई नावालाच, उपलब्धतेचाच अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:35+5:302021-04-22T04:35:35+5:30
--दररोजची गरज ५१०-- रेमडेसिविर इंजेक्शनची जिल्ह्याची सध्याची गरज ही दररोजची ५१० इंजेक्शनची आहे. त्या तुलनेत जिल्ह्याला प्रत्यक्षात दररोज ४० ...
--दररोजची गरज ५१०--
रेमडेसिविर इंजेक्शनची जिल्ह्याची सध्याची गरज ही दररोजची ५१० इंजेक्शनची आहे. त्या तुलनेत जिल्ह्याला प्रत्यक्षात दररोज ४० टक्केच इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. अर्थात दररोज २१० इंजेक्शनच उपलब्ध होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-- इंजेक्शनचा कोटा वाढविण्याची गरज--
जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ५०० च्या घरात गेली आहे. या रुग्णांपैकी किमान १५ टक्के रुग्ण हे साधारणत: गंभीर किंवा त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन तथा ऑक्सिजनची गरज भासत असते. त्यानुषंगाने विचार करता जिल्ह्यात जवळपास एक हजार रुग्णांना रेमडेसिविरची गरज वर्तमान स्थितीत लागू शकते त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा कोटा वाढविण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
--जिल्ह्यातील रुग्णांची संख्या--
एकूण बाधित : ५४,८२१
सक्रिय रुग्ण: ७,३२६
--इंजेक्शनच्या नव्या किंमती--
कॅडिला- ८९९ रु.
डॉ. रेड्डीज- २७०० रु.
सिप्ला- ३००० रु.
मायलॅन- ३,४०० रु.
ज्युबिलंट- ३४०० रु.
हेटेरो- ३४९० रु.