चारधाम यात्रेचे आश्वासन देवून फसवणूक; हरीद्वार येथील ट्रॅव्हल्स संचालकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 05:51 PM2018-07-27T17:51:21+5:302018-07-27T17:53:26+5:30

  Cheating by assuring Char Dham Yatra; Crime against the Director of Travels in Haridwar | चारधाम यात्रेचे आश्वासन देवून फसवणूक; हरीद्वार येथील ट्रॅव्हल्स संचालकाविरुद्ध गुन्हा

चारधाम यात्रेचे आश्वासन देवून फसवणूक; हरीद्वार येथील ट्रॅव्हल्स संचालकाविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देहरीद्वार येथील ट्रॅव्हल्स चालक सुनिल चव्हाण याने चारधाम दर्शन यात्रेच्या माफक दरात आयोजनाबाबत संदेश पाठविला होता.हा संदेश मिळाल्यानंतर गणेश उमाळे यांच्याशी संपर्क साधून बोलणी केली. २६ जुलै २०१८ पर्यंत सुनिल चव्हाण याने चारधाम यात्रेचे पैसे घेवून सुध्दा यात्रा घडवून आणली नाही.


खामगाव: ७२ हजार रुपये घेवूनही हेलीकॉप्टरने चारधाम यात्रा न घडविता शेगाव येथील इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी हरीद्वार येथील एका ट्रॅव्हल्स संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ट्रॅव्हल्स संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
वर्ल्ड टुल्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सचे संचालक गणेश सदाशिव उमाळे (३५) रा. शेगाव यांच्या व्हॉट्स अप वर हरीद्वार येथील ट्रॅव्हल्स चालक सुनिल चव्हाण याने चारधाम दर्शन यात्रेच्या माफक दरात आयोजनाबाबत संदेश पाठविला होता. हा संदेश मिळाल्यानंतर गणेश उमाळे यांच्याशी संपर्क साधून बोलणी केली. १५ मे २०१८ रोजी देना बँक शाखा खामगावच्या मार्फतत सुनील चव्हाण यांच्या खात्यात ७२ हजार रुपए जमा केले. त्यानंतर चारधाम यात्रेबाबत वांरंवार चर्चा करुनही चव्हाण यांचेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे २६ जुलै २०१८ पर्यंत सुनिल चव्हाण याने चारधाम यात्रेचे पैसे घेवून सुध्दा यात्रा घडवून आणली नाही. तसेच पैसेही परत केले नाही. त्यामुळे उमाळे यांनी ७२ हजाराने फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली. याप्रकरणी गणेश उमाळे यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. या तक्ररीवरुन सुनिल चव्हाण याच्या विरुध्द भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title:   Cheating by assuring Char Dham Yatra; Crime against the Director of Travels in Haridwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.