मविमकडून राबविलेल्या याेजनांची चाैकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:47+5:302021-07-07T04:42:47+5:30

सुलतानपूर : महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी कार्यन्वित असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडाळाच्या (मविम) वतीने राबविण्यात आलेल्या याेजनांची ...

Check the plans implemented by MVM | मविमकडून राबविलेल्या याेजनांची चाैकशी करा

मविमकडून राबविलेल्या याेजनांची चाैकशी करा

Next

सुलतानपूर : महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी कार्यन्वित असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडाळाच्या (मविम) वतीने राबविण्यात आलेल्या याेजनांची चाैकशी करून, दाेषींवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास, ६ जुलैपासून बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ बुलडाणांतर्गत सन २०१७ ते २०२१ दरम्यान मंजूर लाभार्थी महिला बचत गटांच्या योजनेचा लाभ कागदाेपत्रीच देण्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे, तसेच योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या किमतींची सत्यता पडताळणी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. वेणी ता.लोणार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महिला बचत गटाला मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत २०२०-२१ मध्ये मविम बुलडाणामार्फत वाटप करण्यात आलेल्या कृषी अवजार बॅंक याेजनेचा लाभ या गटास न देता, दुसऱ्याच गटास देण्यात आला. या प्रकरणी लाभार्थी महिलांनी चौकशीची मागणी करताच, त्यांना चौकशी होण्याआधीच नाेटीस पाठविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी दाेषींवर कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्य रेणुका दिलीपराव वाघ यांनी केली आहे.

Web Title: Check the plans implemented by MVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.