डिडोळा येथे एचआयव्ही, एड्स मुक्त गाव मोहिमेला उत्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 05:08 PM2017-11-21T17:08:26+5:302017-11-21T17:10:20+5:30
मोताळा : आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळा यांच्या वतीने एचआयव्ही, एड्स मुक्त गाव मोहिम अंतर्गत डिडोळा बु. या ठिकाणी एचआयव्ही, एड्स संपूर्ण मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम घेण्यात आला.
मोताळा : आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळा यांच्या वतीने एचआयव्ही, एड्स मुक्त गाव मोहिम अंतर्गत डिडोळा बु. या ठिकाणी एचआयव्ही, एड्स संपूर्ण मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच वेणुबाई शिंब्रे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय मोताळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.परेश जैस्वाल, डॉ.अमोल पाटील, अशोक महाले व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयसीटीसी समुपदेशक गजानन लहासे होते. यावेळी गजानन लहासे यांनी ‘होऊया सारे एकसंघ, करुया एचआयव्ही, एड्सचा प्रतिबंध, या म्हणीपासून मार्गदर्शनाला सुरुवात केली. त्यांनी एचआयव्ही, एड्स मुक्त गाव मोहिमेचा उद्देश, एचआयव्ही कसा होतो, कसा टाळता येतो, एआरटी औषधाचे महत्व व समाजातील प्रत्येक व्यक्तीला एचआयव्ही एड्स बाबतची बेसीक माहिती असण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी एचआयव्ही, एड्स माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर जवळपास १५० ग्रामस्थांच्या एचआयव्ही तपासण्या करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक दिलीप लांजुळकर, एएनएम शितल चव्हाण, एमपीडब्ल्यु गवळी व डिडोळा बु. गावातील सर्व आशा, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महिला बचत गट, युवक वर्ग व समाजसेवक गजानन शिंब्रे यांचे सहकार्य लाभले.(प्रतिनिधी)