रासायनिक खते, बियाण्यांच्या किमतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:29+5:302021-05-16T04:33:29+5:30
खरबडी येथे लसीकरणास प्रारंभ माेताळा : तालुक्यातील खरबडी येथे १३ मे रोजी कोरोनापासून संरक्षण साठी वापरली जाणारी कोविशिल्डचे लसीकरण ...
खरबडी येथे लसीकरणास प्रारंभ
माेताळा : तालुक्यातील खरबडी येथे १३ मे रोजी कोरोनापासून संरक्षण साठी वापरली जाणारी कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले आहे. खरबडी येथील मराठी शाळेत १३ मे रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण घेण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सरपंच शालिनी राजू वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
आगीत दाेन दुचाकी जळाल्याने नुकसान
लाेणार : खापरखेड घुले येथील पंडित रामलाल राठोड यांच्या राहत्या घराला १२ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरासह दोन मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत त्यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
साक्षी वाघ हिच्या कथेला पुरस्कार
देऊळगांवराजा : येथील साक्षी कैलास वाघ हिने ‘अस्वलांचे संरक्षण’ या विषयी लिहिलेल्या कथेला आंतरराष्ट्रीय डब्ल्यूसीबी रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यावर अॅनिमेशनद्वारा लघू चित्रपटही तयार करण्यात आला आहे.
केळवद येथे रक्तदान शिबिर
बुलडाणा : केळवद ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३५ दात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला आमदार श्वेता महाले, जि.प. सदस्या ज्योती खेडेकर यांनी भेट देऊन गावातील आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेतला.
देवपूर परिसरात बिबट्याचा वावर
बुलडाणा : तालुक्यातील देवपूर शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १३ मे रोजी या बिबट्याने हरणाची शिकार केली होती. त्यामुळे हा बिबट्या पुन्हा शिकार स्थळी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शेख इम्रान पुरस्काराने सन्मानित
माेताळा : महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा भारतसेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार शेख इम्रान शेख उस्मान यांना देण्यात आला. कोथळी येथील पत्रकार शेख इम्रान उस्मान यांना ऑनलाइन हा पुरस्कार १० एप्रिल रोजी महात्मा गांधी पीस फाउंडेशनचे डॉ.ऋषिकेश आचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़
फुलशेतीचे हजाराे रुपयांचे नुकसान
बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध जातीचे फुले, झेंडू, नवरंग, बिजली आदी पेरली आहेत व ती फुलशेती बहरून आलेली आहे. मात्र, काेराेना निर्बंधामुळे बाजारपेठ बंद असल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहेत.
लसीकरणाची टाेकन पद्धती बंद करा
बुलडाणा : गत काही दिवसांपासून काेराेना लसीचा दुसरा डाेस घेण्यासाठी गर्दी हाेत आहे. लसीकरणासाठी टाेकन पद्धती वापरण्यात येत असून, त्यामध्ये गैरप्रकार हाेत आहे. त्यामुळे लसीकरणाची टाेकन पद्धती बंद करा, अशी मागणी हाेत आहे.
दहावीचे परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी
बुलडाणा : काेराेना संक्रमण वाढत असल्याने, राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या परीक्षांचे शुल्क पालकांना परत करण्याची मागणी हाेत आहे. आधीच अनेक पालक आर्थिक संकटात सापडलेले आहेत.
लोणार, मेहकर मार्गाने रेतीची चोरटी वाहतूक
सुलतानपूर : लोणार ते मेहकर या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. अंधाराचा फायदा घेत रात्री १० वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत टिप्परची भरधाव वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली आहे. परिणामी, अपघातांच्या घटना वाढत आहेत.
सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम अपूर्ण
धाड : परिसरातील सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या कमी पावसामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. प्रत्येक गावात नदी, नाल्यांवर सिमेंट नाला बांध बांधले, परंतु काही ठिकाणी हे काम अपूर्ण स्थितीत अडकले आहे.
प्लास्टीकचा सर्रास वापर
धामणगाव बढे : शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे, तरी येथे वापर सुरू आहे. या पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे. कारवाई थंडावल्याने प्लास्टीकचा वापर वाढला आहे.