बुलडाणा : येळगावनजीक नदी पात्रात पडलेल्या रसायनाने घेतला पेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:42 AM2018-04-24T01:42:56+5:302018-04-24T01:44:15+5:30

बुलडाणा :  येळगावनजीकच्या पैनगंगा नदीवरील पुलावरून  केमिकलचा टँकर कोसळल्याची घटना ७ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, २३ एप्रिल रोजी दुपारी नदीपात्रात पडलेल्या केमिकलने अचानक पेट घेतल्याने रस्ता व परिसरातील झाडे जळाली. त्यामुळे चिखली-बुलडाणा मार्गावरील वाहतूक काही वेळ बंद होती.

The chemical fire in the river! | बुलडाणा : येळगावनजीक नदी पात्रात पडलेल्या रसायनाने घेतला पेट!

बुलडाणा : येळगावनजीक नदी पात्रात पडलेल्या रसायनाने घेतला पेट!

Next
ठळक मुद्देयेळगावजवळील घटना; लगतची झाडे जळाली 

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा :  येळगावनजीकच्या पैनगंगा नदीवरील पुलावरून  केमिकलचा टँकर कोसळल्याची घटना ७ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, २३ एप्रिल रोजी दुपारी नदीपात्रात पडलेल्या केमिकलने अचानक पेट घेतल्याने रस्ता व परिसरातील झाडे जळाली. त्यामुळे चिखली-बुलडाणा मार्गावरील वाहतूक काही वेळ बंद होती.
कर्नाटकमधून साबणाचे केमिकल भरलेला टँकर घेऊन चालक पन्नाराम भारमाल वय २५ रा. राजस्थान हा मध्यप्रदेशमधील पालमपूरला जात होता. येळगावनजीकच्या पैनगंगा नदीवरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पुलावरून खाली कोसळला होता. चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघात घडल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने टँकर काढून घेण्यात आला होता; मात्र नदी पात्रात मोठय़ा प्रमाणावर केमिकल पडले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी या केमिकलने पेट घेतला. त्यामुळे अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळांनी रुद्र रूप धारण केले. सुदैवाने या आगीमुळे कुठलीच अनुचित घटना घडली नाही. आगीमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने धाव घेत आग विझवली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.  दरम्यान, ही आग वाढत्या तापमानामुळे लागली की इतर कारणामुळे, याबाबत चर्चा रंगली होती. 

Web Title: The chemical fire in the river!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.