छत्तीसगढच्या राष्ट्रीय  स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 05:25 PM2017-12-04T17:25:19+5:302017-12-04T22:39:35+5:30

बुलडाणा : १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जगदलपूर (छत्तीसगड) येथे १७ वर्षाखालील मुलामुलींची ६३ वी राष्ट्रीय  शालेय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बुलडाण्यातील प्रथमेश समाधान जवकार याने महाराष्टÑाचे प्रतिनिधीत्व करताना कंपाऊंड आर्चरी या क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण व एका रजत पदकाची कमाई केली आहे.

Chhattisgarh national champion , buldana player win gold | छत्तीसगढच्या राष्ट्रीय  स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर!

छत्तीसगढच्या राष्ट्रीय  स्पर्धेत चमकला बुलडाण्याचा धनुर्धर!

googlenewsNext
ठळक मुद्देजगदलपूर येथे शालेय स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व एक रजत पदकराष्ट्रीय  शालेय स्पर्धा

बुलडाणा : १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जगदलपूर (छत्तीसगड) येथे १७ वर्षाखालील मुलामुलींची ६३ वी राष्ट्रीय  शालेय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बुलडाण्यातील प्रथमेश समाधान जवकार याने महाराष्टचे प्रतिनिधीत्व करताना कंपाऊंड आर्चरी या क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण व एका रजत पदकाची कमाई केली आहे. प्रथमेश समाधान जवकार याने ६३ व्या राष्ट्रीय  शालेय स्पर्धेमध्ये धनुर्विद्या प्रकारात सर्वसाधारण प्रकारात सुवर्ण, आॅल्मपिक राऊंड इलिमीनेशन प्रकारात सुवर्ण आणि सांघीक प्रकारात रजत पदक जिंकुन त्याने आपल्या जिल्ह्याचा व राज्याचा गौरव वाढविला आहे. प्रथमेश समाधान जवकार हा
प्रबोधन विद्यालय बुलडाणाचा विद्यार्थी असून तो आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक मोहरीर, क्रीडा शिक्षक गणेशे तसेच द्रोणाचार्य आर्चरी अ‍ॅकॅडमीचे प्रशिक्षक व मार्गदर्शक चंद्रकांत इलग यांना देतो.

Web Title: Chhattisgarh national champion , buldana player win gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.