मुख्यमंत्र्यांनी दिलेला ३११ कोटींच्या निधीचा शब्द पाळावा - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:45 AM2018-01-13T01:45:39+5:302018-01-13T01:46:13+5:30
सिंदखेडराजा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवपीठावरून ३११ कोटी रुपये जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी जाहीर केले होते; परंतु तीन वष्रे होऊनसुद्धा अद्याप एक रुपयाही निधी दिला नाही. आता जर तत्काळ ३११ कोटी रुपये निधी दिला नाही, तर १ फेब्रुवारी रोजी मी महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून मातृतीर्थावर येऊन उपविभागीय कार्यालयासमोर गांधीजींच्या मार्गाने धरणे आंदोलन करणार, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क

नगर परिषद सिंदखेडराजा यांनी आयोजित केलेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रास्ताविक करताना नगराध्यक्ष अँड. नाझेर काझी म्हणाले, नगरपालिकेच्यावतीने ३ जानेवारी ते १२ जानेवारी दशरात्रोत्सव सोहळा घेण्यात आला. सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव हा लोकउत्सव व्हावा, म्हणून आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत असल्याचे काझी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, की ३११ कोटी रुपयांचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आता जिजाऊ भक्त त्यांना माफ करणार नाहीत.
आ.प्रकाश गजभिये, माजी मंत्री राजेश टोपे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमासाठी आ.संजय वाघचौरे, माजी आ.नानाभाऊ कोकरे, राष्ट्रवादी सेल प्रदेश अध्यक्ष प्रदीप साळुंके, जि.प. उपाध्यक्ष मंगलताई रायपुरे, नगर अध्यक्ष अँड.नाझेर काझी, न.प. उपाध्यक्ष सीमा शेवाळे, पं.स. सभापती राजेश ढोके, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, माजी नगराध्यक्ष राजेश बोंद्रे, जि.प. सदस्य दिनकर देशमुख, रा.काँ. जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, नगरसेवक डॉ.सविता बुरकुल, नगरसेविका छबाबाई जाधव, नगरसेवक शेख गफ्फार, रा.काँ. शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे, न.प. मुख्याधिकारी धनo्री शिंदे, अँड. संदीप मेहेत्रे, सिद्धार्थ जाधव, शेख यासिन, बुद्धू चौधरी, नितीन चौधरी, सुनील झोरे, साजेद काझी यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सोहळ्यातील विजेत्यांना विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.