मुख्यमंत्री रविवारी नांदुर्‍यात; लघु प्रकल्पांच्या कामांना होणार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:00 AM2017-12-15T01:00:13+5:302017-12-15T01:02:37+5:30

बुलडाणा : जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासह आठ लघु प्रकल्पांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ परिहवन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी नांदुरा येथे प्रारंभ होत आहे.

Chief Minister on Sunday in Nandur; Start of work on small projects | मुख्यमंत्री रविवारी नांदुर्‍यात; लघु प्रकल्पांच्या कामांना होणार प्रारंभ

मुख्यमंत्री रविवारी नांदुर्‍यात; लघु प्रकल्पांच्या कामांना होणार प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देजलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांचीही राहणार उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासह आठ लघु प्रकल्पांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ परिहवन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी नांदुरा येथे प्रारंभ होत आहे.
बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत या कामांचा हा शुभारंभ होत आहे. राज्यात  निधीअभावी रखडलेल्या २१ मुख्य व ८३ लघु अशा एकूण १0४ प्रकल्पांची कामे  आता शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेतून पूर्ण होणार आहे. शेतकरी आ त्महत्याग्रस्त तथा  दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यातील प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.  त्यात विदर्भातील ८१ रखडलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत  जिल्हय़ातील जिगावसह आठ लघु प्रकल्पांसाठी अनुदान मिळणार आहे.  नांदुरा  येथे १७ डिसेंबर रोजी या कामांचा शुभारंभ होत आहे. सकाळी ११ वाजता  कोठारी  विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होईल. 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश  महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील उ पस्थित राहणार आहेत. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प केंद्र शासनाने  मंजूर केलेल्या अर्थसहाय्यतेंतर्गत जिगावसह या आठ प्रकल्पांचे काम पूर्ण होणार  आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगली  आहे.

या प्रकल्पांचा समावेश
यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी, अरकचेरी, खामगाव तालुक्यातील  निम्न ज्ञानगंगा प्रकल्प, मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी, देऊळगाव राजा तालुक्यातील  दिग्रस कोल्हापुरी बंधारा, लोणारमधील बोरखेडी मिश्र संग्राहक तलाव आणि मो ताळा तालुक्यातील राहेरा संग्राहक तलावाचा समावेश आहे. या योजना पूर्णत्वास  गेल्यानंतर जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्यास मदत मिळेल, असे विदर्भ  पाटबंधारे विकास महामंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
-

Web Title: Chief Minister on Sunday in Nandur; Start of work on small projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.