मुख्यमंत्र्यांचा बुलडाण्यात ‘सेल्फी विथ जेसीबी’

By atul.jaiswal | Published: March 3, 2018 12:51 PM2018-03-03T12:51:02+5:302018-03-03T12:55:43+5:30

प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शनिवारी बुलडाणा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी उद्घाटनस्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर जेसीबी व पोकलेश मशिनसोबत सेल्फी काढला.

Chief Minister's take 'Selfie With JCB' in Buldana | मुख्यमंत्र्यांचा बुलडाण्यात ‘सेल्फी विथ जेसीबी’

मुख्यमंत्र्यांचा बुलडाण्यात ‘सेल्फी विथ जेसीबी’

Next
ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या पथदर्शी कार्यक्रमाची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यापासून होत असून, यासाठी ‘बीजेएस’ने १३४ जेसीबी/पोकलेन मशिन्स खरेदी केल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी उद्घाटन करण्यात आले. येथील ए.आर.डी. मॉल समोरच्या पटांगणात पार्क करण्यात आलेल १३४ जेसीबी/पोकलेन मशिनसोबत सेल्फी काढण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना आवरला नाही.

बुलडाणा : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत संपूर्ण बुलडाणा जिल्हा एका वर्षात दुष्काळमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शनिवारी बुलडाणा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी उद्घाटनस्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर जेसीबी व पोकलेश मशिनसोबत सेल्फी काढला.

भारतीय जैन संघटनेच्या पथदर्शी कार्यक्रमाची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यापासून होत असून, यासाठी ‘बीजेएस’ने १३४ जेसीबी/पोकलेन मशिन्स खरेदी केल्या आहेत. एका वर्षात ४ कोटी क्यूबिक मिटर गाळ काढून किमान ५० हजार एकर जमीन सुपिक करून सुमारे २८ अब्ल लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढविणाºया कार्यक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी येथील ए.आर.डी. मॉल समोरच्या पटांगणात पार्क करण्यात आलेल १३४ जेसीबी/पोकलेन मशिनसोबत सेल्फी काढण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना आवरला नाही. यावेळी त्यांच्यासोबत नितीन गडकरी, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, बीजेएसचे शांतीलाल मुथ्था व इतर मान्यवर उपस्थित होते. बुलडाण्यातील क्रेडाई तर्फे या ठिकाणी १० बाय १० व १० फुट उंचीचा सेल्फी पॉइंट बनविण्यात आला आहे.
बीजेएसचे शांतीलाल मुथ्था व श्री जितेंद्र जैन यांनी या सेल्फी पॉईटवर फोटो घेऊन उदघाटन केले. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या सेल्फी पॉईटवरून सेल्फी काढून सोशल मिडीया द्वारे बुलडाणा जिल्ह्याच्या माहितीसह सर्वांना पाठवावी असे आवाहन जितेंद्र जैन व राजेश देशलहरा यांनी केले आहे.

 

Web Title: Chief Minister's take 'Selfie With JCB' in Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.