मुख्याधिकारी पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:33 AM2018-04-18T01:33:39+5:302018-04-18T01:33:39+5:30
खामगाव : प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांना खामगाव नगर पालिका ‘नकोशी’ असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही पालिकेत भेट दिली नाही. परिणामी, खामगाव नगर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांना खामगाव नगर पालिका ‘नकोशी’ असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही पालिकेत भेट दिली नाही. परिणामी, खामगाव नगर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळल्याचे दिसून येते.
खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर ९ एप्रिलपासून दीर्घ रजेवर गेले आहेत. दीर्घ रजेवर जाण्यापूर्वी काही दिवस मुख्याधिकारी बोरीकर किरकोळ रजेवर होते. तथापि, गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी बोरीकर यांचे खामगाव पालिकेत मन रमत नसल्याची चर्चा असतानाच, अचानक ते महिनाभराच्या दीर्घ रजेवर गेले. त्यांच्या अनुपस्थितीत खामगाव नगर पालिकेचा पदभार शेगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याकडे सोपविण्यात आला. मुख्याधिकारी पंत यांनी ९ एप्रिल रोजी खामगाव पालिकेचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यासाठी केवळ १0-१५ मिनीटे ते नगर पालिकेत आले. पदभार स्वीकारल्यानंतर सुटीचे दिवस सोडून आठ दिवस लोटले. मात्र, या आठ दिवसांच्या कालावधीत एकदाही मुख्याधिकारी पंत यांनी खामगाव पालिकेला भेट दिली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’ तर नाही ना? अशी चर्चा पालिका वतरुळात रंगत आहे.
पदभार स्वीकारण्यावरून होती नाराजी !
खामगाव पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर दीर्घ रजेवर गेल्यानंतर त्यांच्या रिक्त पदाचा प्रभार स्वीकारण्यास मुख्याधिकारी अतुल पंत शेवटच्या क्षणापर्यंत नाराज होते. त्यामुळे खामगाव पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सुत्रे घेण्यास सुरूवातीपासूनच कोणतेही स्वायरस्य दाखविले नाही. वरिष्ठांच्या आदेशानंतर त्यांनी सुत्रे स्वीकारली मात्र, पदभार घेतल्यापासून ते पालिकेत फिरकलेच नसल्याने, अतुल पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’ असल्याची चर्चा आहे.
यहा पे सब शांती शांती है!
मुख्याधिकारी नसल्याने पालिकेत येणार्यांची संख्या कमालिची रोडावली आहे. पालिकेत कुणीही फिरकत नसल्याने ‘यहा पे सब शांती शांती है!’ या ओळीचा प्रत्यय येत आहे. तथापि, कुणाचाही वचक नसल्याने कर्मचारीही सैरभैर झाल्याचे चित्र पालिकेत गेल्या आठ-दहा दिवसांपासून सतत दिसून येत आहे.