चिखली पोलिसांची भाऊबीज भिल्ल वस्तीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 04:06 PM2020-11-18T16:06:52+5:302020-11-18T16:07:02+5:30

Chikhali Police News चिखली पोलिसांनी रोजमजुरी करून गुजराण करणाऱ्या गरीब महिलांच्या घरी भाऊबीज साजरी केली आहे.

Chikhali police's celebrate BhauBij festival on Jipsy's Area | चिखली पोलिसांची भाऊबीज भिल्ल वस्तीवर !

चिखली पोलिसांची भाऊबीज भिल्ल वस्तीवर !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : प्रत्येकजण आपापल्या कुटूंबियांसमवेत उत्साहात दिवाळी साजरी करत असताना ‘जनतेची सुरक्षा हीच आमची दिवाळी’ मानून ऐन दिवाळीतही चोखपणे कर्तव्य बजावणाºया चिखली पोलिसांनी रोजमजुरी करून गुजराण करणाऱ्या गरीब महिलांच्या घरी भाऊबीज साजरी केली आहे.
पोलिसांना दिवाळीसारख्या मोठा सण देखील आपल्या परिवारासमवेत साजरा करता येत नाही. उलटपक्षी दिवाळीत कोणावरही विघ्न येवू नये यासाठी डोळ्यात तेल ओतून त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. हे होत असताना अनेकांची दिवाळी अंधारात जात असल्याची बाब पोलिसांपासून लपून राहत नाही. त्यात यंदा कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे असल्याची बाब हेरून चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी कर्तव्य बजावत असतानाच दुर्लक्षित, गोरगरीबांत मिळसून त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली आहे. याअंतर्गत १६ नोव्हेंबर रोजी त्यांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांसवमेत तालुक्यातील मलगी येथील भिल्ल समाजातील हातमजुरीवर गुजरान करणाऱ्या गरीब महिलासमवेत भाऊबीज साजरी करून एक सुखद धक्का दिला. 
यावेळी ठाणेदार वाघ यांच्यासमवते एएसआय बाळु राजपूत, हेकाँ अशपाक, नापोका शरद गिरी, पोकॉ रणजित हिवाळे, समाधान सोणागरे, पोलिस पाटील भगवान शेळके यांची उपस्थिती होती. कोणताही गाजावाजा नाही की, पूर्वकल्पना नाही. अशा स्थितीत अचानकपणे वस्तीवर खाकीच्या रूपात आलेल्या भावांकडून मिळालेले प्रेम, आपुलकी आणि भाऊबीजेच्या भेटीने वस्तीवरील महिलांनाही गहिवरून आले. तर नागरीकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी कुटूंबियांपासून दूर राहून चोविस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांनाही यामाध्यमातून बहिणीची माया मिळाल्याने ते देखील भारावले.  

Web Title: Chikhali police's celebrate BhauBij festival on Jipsy's Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.