दि चिखली अर्बन ठरली 'बोर्ड ऑफ मॅनेजमेंट'ची स्थापना करणारी पहिली बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:19+5:302021-03-13T05:02:19+5:30
दि.चिखली अर्बन को-ऑप बँकेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा 'वेबेक्स' व 'फेसबुक' माध्यमाद्वारे ऑनलाईन पद्धतीने ११ मार्च रोजी पार ...
दि.चिखली अर्बन को-ऑप बँकेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा 'वेबेक्स' व 'फेसबुक' माध्यमाद्वारे ऑनलाईन पद्धतीने ११ मार्च रोजी पार पडली. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव व यानुषंगाने असलेल्या शासन आदेश व निकषांचे पालन करून सभा घेण्यात आली. राष्ट्रगायनाने सभेला सुरूवात करण्यात आणि कामकाज सुरूवात करण्यापूर्वी अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या थोर व्यक्ती, विभूती, शास्त्रज्ञ, खेळाडू, बँकेचे माजी उपाध्यक्ष डॉ. गणेश खांडेभराड, शेषराव शेळके व कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी भूषवले. मागील वर्षीच्या सभेच्या कामकाजाची इतिवृत्त वाचून कायम करणे बाबतचा ठराव बँकेचे सरव्यवस्थापक संजय भांगिरे यांनी मांडला. बँकेचे उपाध्यक्ष पुरूषोत्त दिवटे व इतर संचालकांनी विविध विषय सभेसमोर मांडले. सर्व विषयांना सभासदांनी टाळ्या वाजवून मान्यता दिली. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, माजी संचालक दादा व्यवहारे, हेमचंद डोणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पसायदानाने सभेची सांगता झाली. (वा. प्र.)