चिखली @ ९२.५२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 12:53 AM2017-06-14T00:53:34+5:302017-06-14T00:53:34+5:30
चिखली तालुक्याच्या निकालाची एकूण टक्केवारी ९२.५२ इतकी आहे. तालुक्यातील एकूण ६५ शाळा व माध्यमिक विद्यालयांपैकी सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ६ जून रोजी आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, यामध्ये चिखली तालुक्याच्या निकालाची एकूण टक्केवारी ९२.५२ इतकी आहे. तालुक्यातील एकूण ६५ शाळा व माध्यमिक विद्यालयांपैकी सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, निकालाची सरासरीही गतवर्षा इतकीच आहे.
तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढील घोषित करण्यात आला. अमर विद्यालय अमडापूर ९१.३०, शासकीय माध्यमिक विद्यालय चिखली ७०, राजाभाऊ बोंद्रे नगर परिषद विद्यालय चिखली ७४.१४, आदर्श विद्यालय चिखली ९५.५८, श्री शिवाजी विद्यालय किन्होळा ९०.३८, जि.प.माध्यमिक विद्यालय मंगरूळ नवघरे ९१.९५, श्री शिवाजी हायस्कूल शेलसूर ९१.३५, सरस्वती माध्यमिक विद्यालय भोकर ९१.६६, विवेकानंद विद्यालय एकलारा ९८.७३, श्री शिवाजी हायस्कूल उंद्री ९६.८८, श्री शिवाजी हायस्कूल इसोली ९५.५०, श्री सिद्धेश्वर विद्यालय कोलारा ९३.०२, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय सवणा ९२.८५, श्री शिवाजी माध्यमिक शाळा चिखली ९३.१५, श्री ज्ञानेश्वर हायस्कूल पेठ ८४.८७, तक्षशीला माध्यमिक विद्यालय चिखली ९६.३४, पोस्ट बेसीक आश्रमशाळा करवंड ८४.३७, जि.प.उर्दू माध्यमिक शाळा अमडापूर ९८.७०, महाराणा प्रताप विद्यालय चिखली ८८.८८, राधाबाई खेडेकर विद्यालय चिखली ९७.७०, बशीरीया उर्दू हायस्कूल अमडापूर १००, पांडव विद्यालय कव्हळा ९१.६६, श्री.संत गुलाबबाबा विद्यालय दिवठाणा ९३.३३, उमाकांत विद्यालय सातगाव भुसारी ७९.१६, श्री शिवाजी विद्यालय साकेगाव ८८.८८, श्री ज्ञानेश्वर विद्यालय धोत्रानाईक ८५.१८, राजर्षी शाहू विद्यालय दहीगाव ९५.५५, छत्रपती संभाजी विद्यालय केळवद ९५.९१, माध्यमिक आश्रम शाळा किन्ही नाईक ९६.१५,
स्व.मासाहेब मीनाताई ठाकरे विद्यालय खंडाळा म. ८७.५०, शहाजी राजे विद्यालय उंद्री १००, नर्मदा माध्यमिक विद्यालय मंगरूळ (इ.) ९७.०५, जय बजरंग विद्यालय टाकरखेड हेलगा ९६.०७, महाराणा प्रताप विद्यालय बेराळा ९७.९७, सरस्वती माध्यमिक विद्यालय बोरगाव काकडे ८२.०५, सूर्यभान बापू विद्यालय खैरव ९७.१४, सावित्रीबाई विद्यालय भालगाव ९६, जानकीदेवी विद्यालय देऊळगाव धनगर ९७.५८, परमानंद विद्यालय काटोडा १००, श्री शिवाजी विद्यालय अंचरवाडी ८९.६५, श्री शिवाजी हायस्कूल मेरा बु।। ८२, श्री औंढेश्वर विद्यालय शेळगाव आटोळ ९६.५५, शिवाजी पोस्ट बेसीक आश्रम शाळा अंचरवाडी ९०.६२, नेहरू विद्यालय अंत्री खेडेकर ८१.५७, सावित्रीबाई फुले विद्यालय गांगलगाव ७९.५९, जि.प.उर्दू हायस्कूल मेरा बु।। ९७.७२, श्री शिवशंकर विद्यालय भरोसा ९४.१७, स्व.भास्कररावजी शिंगणे विद्यालय पळसखेड दौलत ८३.३३, संभाजी राजे विद्यालय इसरूळ ९२.३०, डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल चिखली ९५.४५, स्व.एस.एम.बी.शिंगणे उर्दू हायस्कूल उंद्री ८३.३३, श्री ज्ञानेश्वर विद्यालय धोत्रा भनगोजी ९३.२०, जि.प.माध्यमिक विद्यालय सावरगाव डुकरे ९६.२९, ज्ञानेश्वर विद्यालय वरखेड ८६.६६, स्व.भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालय अमोना ९७.२९, श्री गुरूदेव विद्यालय धोडप १००, राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा चांधई ९९.२३, गुरूकृपा माध्यमिक विद्यालय पेनसावंगी ९५.७४, श्रीमती प्रभावतीकाकू शिंगणे माध्यमिक विद्यालय गोद्री ८४.२१, श्री शिवाजी हायस्कूल नायगाव बु॥ ९१.५२, अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल १००, स्व.हाजी रोखनखान उर्दू माध्यमिक विद्यालय किन्होळा ८४.६१, आदर्श कॉन्व्हेंट चिखली १००, शासकीय मागासवर्गीय मुलांची निवासी शाळा वळती ९५.४५ व सहकार विद्यामंदिर उंद्री १०० टक्के असा एकूण तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ९२.८४ इतकी लागली आहे.
सहा शाळांचा निकाल १०० टक्के
यावर्षी तालुक्यातील ६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. बशीरीया उर्दू हायस्कूल अमडापूर, शहाजी राजे विद्यालय उंद्री, परमानंद विद्यालय काटोडा, श्री गुरूदेव विद्यालय धोडप, अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्श कॉन्व्हेंट चिखली या सहा शाळांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात सर्वाधिक ६५ शाळा चिखली तालुक्यात आहेत. या एकूण ६५ शाळांमधून इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्यांमध्ये २ हजार ६५४ मुले व २ हजार ७३ मुली असे एकूण ४ हजार ७२७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी २ हजार ४४७ मुले व १ हजार ९४२ मुली असे एकूण ४ हजार ३८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.२० तर उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९३.६८ इतकी असल्याने इयत्ता दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.